ब्रेकिंग न्युज
*शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बजरंग सोनवणे शेतकऱ्याच्या बांधावर* *धारूर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची केली पाहणी* ————————————–वंचितचे अशोक हिंगे यांची समाज माध्यमावर बदनामी केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यातील तीस जनावर गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू…..चिंचाळा येथे विठ्ठल-रखुमाई संत यादवबाबा यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्नसिंदफणा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरीमहापुरुषांचे विचार जतन करावे. – प्राचार्य विकी घायतडकविकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडे यांना निवडून द्या-डॉ.योगेश क्षीरसागरबीडकरांना आदर्श शिंदेंच्या भीमगीतांची मेजवानी*माजलगाव शहरातून बजरंग सोनवणेंची दुचाकी रॅली, घोषणांनी शहर दणाणले.* *बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ नेकनूर परिसरात माजी आ. पृथ्वीराज साठेंच्या गाठीभेटी* —————————-*खा रजनीताई पाटील आणि बजरंग बप्पा सोनवणे यांची भेट !* ————————————-

कोरोनाच्या काळात स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत होते, आपण त्यांचे ऋण व्यक्त करायला हवेत – चंद्रकांत पाटील

 

भाजपा पुणे शहर चिटणीस गिरीश खत्री यांच्या माध्यमातून कोथरूड-कर्वेनगर भागासाठी स्वच्छतेचा नमो करंडक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोमवारी पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रसिद्ध गायक आणि पुणे शहराचे स्वच्छतेचे ब्रॅड ॲम्बेसेडर सलील कुलकर्णी यांच्या सह इतर मान्यवर देखील उपस्थित होते. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छतेसाठी देशभरातील जनतेकडे आग्रह धरला. कोरोनाच्या काळात स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत होते, आपण त्यांचे ऋण व्यक्त करायला हवेत, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मागील वर्षी देखील मी या कार्यक्रमाला आलो होतो. त्याच वेळी शुभेच्छा दिल्या होत्या कि पुढच्या वर्षी पुन्हा कार्यक्रम करूयात. आज या ठिकाणी भाजपच्या वतीने गिरीश खत्री मित्रपरिवार आयोजित नामो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे जी प्रामुख्याने स्वच्छतेवर आधारित अशी हि स्पर्धा होती. एका अर्थाने २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा आग्रह धरला . त्या आग्रहानंतर असं म्हणायला हरकत नाही कि हि देशातली पहिलीच स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक सोसायटीचा सहभाग होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं गेलं. असा हा एक अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले कि, १३७ कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात पंतप्रधानांना स्वच्छतेचं आवाहन करावं लागत. मोदींनी स्वच्छतेचा आग्रह धरला आणि संपूर्ण देशाने त्याला भरभरून प्रतिसाद दिला यासाठी स्पर्धा व्हायला लागल्या, दंड आकारला जाऊ लागला. .आपणं या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले पाहिजे . कोविडच्या काळात आपल्याला आपल्या घरातल्या लोकांसोबत वावरताना भीती वाटत होती. त्यावेळी या कर्मचाऱ्यांनी असे म्हटले असते कि आम्हीही स्वच्छता करणार नाही, तर घाणीचे साम्राज्य असते. आपण त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आणि सर्व विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!