ब्रेकिंग न्युज
बजरंग सोनवणेंच्या अर्धांगिनी उतरल्या प्रचारात सारिकाताई सोनवणेंनी घेतली केजमध्ये महिलांची कॉर्नर बैठक पित्याच्या प्रचारासाठी मुलगा मैदानात.*जिल्ह्यात शेतकरी पुत्र बजरंग बप्पांची लाट गेवराई तालुक्यातुन सर्वात जास्त मताधिक्य मिळणार* *बदामराव पंडित यांनी व्यक्त केला विश्वास* ————————————*जातीचं राजकारण पुढे करत विकासाच्या मुद्याला तिलांजली* *भाजपा उमेदवारावर बजरंग सोनवणेंचा आरोप*शहरातुन मारुती सुझुकी स्विफ्ट कार चोरीलाटाकरवन व उमापूर येथील पंकजाताई च्या सभेस उपस्थित रहावे- शिवराज पवारआज इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा गेवराई तालुका प्रचार दौरा. मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधणार. ———————————-*इंडिया आघाडीच्या पारड्यात बीडचे एक मत टाकण्यासाठी प्रयत्नशील राहणार* – *खा रजनीताई पाटील* *काँग्रेसच्या बैठकीत बजरंग सोनवणेंना विजयी करण्याचा निर्धार* ———————————*तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्मलेल्याना सामान्यांचे दुःख काय कळणार* — *बजरंग बप्पा सोनवणे* ————————————गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संपूर्ण शिक्षण विभागासाठी गौरवास्पद- गटशिक्षणाधिकारी पोले

देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी व काँग्रेसचा लढा.

 

मुंबई, दि. २८ मार्च
भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील ९ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे परंतु या सरकारने जनतेच्या हिताचे एकही काम केलेले नाही. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, जगणे कठीण झाले आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग त्रस्त आहे, नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी लागणारे साहित्य, खत, बि-बियाणे महाग झाले आहे. कोणत्याच घटकाचा विकास मोदी सरकार करु शकले नाही. या मुळ प्रश्नांवर भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा पुढे करुन मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

राहुल गांधी हे सातत्याने नरेंद्र मोदी यांना जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारत असतात. राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत, जे मोदी सरकारच्या कारवायांना न डगमगता ताठ मानेने तोंड देत आहेत. भाजपाने राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी सर्व प्रयत्न करुन पाहिले पण त्यात त्यांना यश आले नाही. आताही खासदारकी रद्द केली, सरकारी घर खाली करण्यास सांगितले, त्याआधी ईडी चौकशी मागे लावली पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. देशात आज लोकशाही व्यवस्था, संविधान धोक्यात आलेले आहे, सर्व यंत्रणा सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या आहेत, याविरोधात लढा देण्याची गरज असून राहुल गांधी व काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान वाचवण्यासठी लढत आहेत आणि ही लढाई आम्ही लढत राहु, असेही नाना पटोले म्हणाले.

error: Content is protected !!