ब्रेकिंग न्युज
शहरातुन मारुती सुझुकी स्विफ्ट कार चोरीलाटाकरवन व उमापूर येथील पंकजाताई च्या सभेस उपस्थित रहावे- शिवराज पवारआज इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा गेवराई तालुका प्रचार दौरा. मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधणार. ———————————-*इंडिया आघाडीच्या पारड्यात बीडचे एक मत टाकण्यासाठी प्रयत्नशील राहणार* – *खा रजनीताई पाटील* *काँग्रेसच्या बैठकीत बजरंग सोनवणेंना विजयी करण्याचा निर्धार* ———————————*तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्मलेल्याना सामान्यांचे दुःख काय कळणार* — *बजरंग बप्पा सोनवणे* ————————————गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संपूर्ण शिक्षण विभागासाठी गौरवास्पद- गटशिक्षणाधिकारी पोलेभक्ती कन्स्ट्रक्शन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर  जयंती मोफत पाणपोई सह विविध उपक्रम राबवून साजरी.ओळख श्री ज्ञानेश्वरीची स्पर्धांचे हरिनाम गजरात पारितोषिक वितरणफ्री व्हाईस ग्रुपच्या मॅरेथॉनमध्ये बाभळगाव महाविद्यालयाच्या मुलींचे यशपाच वर्षे देऊन बघा ; बीड जिल्हयाचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही

जनतेला भेटणार कधी ते ऑफिसबाहेर लिहा, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश;

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांसह प्रशासनाला आदेश दिले आहेत. सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार हे मंत्रालयातल्या दालनाबाहेर एका बोर्डवर लिहा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना दिले आहेत. याशिवाय विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस तशी वेळ राखून ठेवावी असेही म्हटले आहे. या निर्णयामुळे सामान्य व्यक्तींना सुद्धा आता मंत्र्यांना भेटता येणार आहे.

सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याच विभागाकडून मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलंय. कामाचे स्वरुप लक्षात घेऊन मंत्र्यांनी अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातले ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. तसंच भेटण्याची वेळ आणि दिवस याची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा असेही आदेश दिले आहेत.

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव शीतल असं आहे. महिलेच्या पतीच्या नावावर धुळे एमआयडीसीत प्लॉट होता. तो एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप महिलेने केला होता. त्यासंदर्भात महिला मंत्रालयात आली होती. त्यावेळी विष घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेला जेजे रुग्णालयात दाखल केल. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!