ब्रेकिंग न्युज
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी..शालेय कामी तीन शिक्षक गैरहजर ; गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई कडे लक्षसंविधान वाचविण्यासाठी मी जिल्ह्याचा खासदार होऊन संसदेत जाणार – बजरंग सोनवणेशुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती बीडच्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलचा उपक्रमअलंकापुरीत हनुमान जन्मोत्सव नामजयघोषात साजरात्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या वतीने मतदान जनजागृती अभियान*बजरंग बप्पा सोनवणे यांनी घेतले स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या समाधीचे दर्शन**धार्मिक स्थळांचे दर्शन, महापुरुषांना अभिवादन करीत बजरंग सोनवणेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज* ——————————–*तलवाडा येथे बजरंग बाप्पांनी केले डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन !**माझ्या शेतात काय पिकते अन काय विकते ? याचा अनुभव पालकमंत्र्यांना आहे !* *बजरंग सोनवणे यांचे सडेतोड उत्तर* ————————————–

आपल्याला सावरकरांविरुद्ध नव्हे मोदींच्या भाजपविरुद्ध लढायचंय!

 

‘मी सावरकर नव्हे, गांधी आहे. मी माफी मागणार नाही’, या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. आपल्याला सावरकरांविरुद्ध नव्हे तर मोदींच्या भाजपविरुद्ध लढायचंय त्यापासून विरोधकांनी दूर जाणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीस सोनिया गांधी, राहुल गांधीही उपस्थित होते.

या बैठकीत शरद पवार यांनी आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचा संबंध नाही. ते कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली. तसेच राहुल यांच्या विधानाचा फटका राज्यात महाविकास आघाडीला बसू शकतो, याची जाणीव करून देत पवारांनी काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला.

सोनिया गांधींच्या समक्ष शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे तसेच राहुल गांधी यांनी आपण पवारांच्या मताचा आदर करत असल्याचे सांगत सावरकरांच्या मुद्दय़ावर नरमाईची भूमिका घेतली. काँग्रेस अध्यक्ष खरगे यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. भाजपविरोधात लढण्याच्या व्यापक उद्देशाने विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची राजकीय विचारसरणी वेगवेगळी आहे तरीही, आम्ही एकमेकांशी जुळवून घेत आहोत, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!