ब्रेकिंग न्युज
बीड जिल्ह्यातील बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व खात्याने शोध मोहिम केली सुरूसमाजविकासात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असते : डाॅ.विशाल जाधववीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक शाम गदळे महाविद्यालयाच्या ‘रा.से.यो’ शिबिराचा समारोप संपन्नशेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा करायला विलंब कोणामुळे ?  – वसंत मुंडे अर्धा उन्हाळा संपत आला तरी सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा विसरअट्टल महाविद्यालयात भारत सरकारचा स्वच्छता आणि मतदार जागृती उपक्रममस्सा जोग जवळ भिषण अपघात.राजा शिवछत्रपती पारंपारिक शिवजन्मोत्सव अंबाजोगाई आयोजित ऐतिहासिक शोभायात्रेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे -अध्यक्ष संतोष काळेअवघ्या दोन वर्षांच्या रिधाने आयुष्यातील पाहिला रोजा पूर्ण

जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून सावरकरांचा मुद्दा

 

मुंबई | भारतीय जनता पक्ष देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. माध्यमाशी बोलताना नाना पटोले यांनी हा आरोप लगावला आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, मागील ९ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे परंतु या सरकारने जनतेच्या हिताचे एकही काम केलेले नाही. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, जगणे कठीण झाले आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग त्रस्त आहे, नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी लागणारे साहित्य, खत, बि-बियाणे महाग झाले आहे. कोणत्याही घटकाचा विकास मोदी सरकार करु शकले नाही. या मुळ प्रश्नांवर भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा पुढे करुन मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

आजराहुल गांधी हे सातत्याने नरेंद्र मोदी यांना जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारत असतात. राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत, जे मोदी सरकारच्या कारवायांना न डगमगता ताठ मानेने तोंड देत आहेत. भाजपने राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी सर्व प्रयत्न करुन पाहिले पण त्यात त्यांना यश आले नाही. आताही खासदारकी रद्द केली, सरकारी घर खाली करण्यास सांगितले, त्याआधी ईडी चौकशी मागे लावली पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. देशात आज लोकशाही व्यवस्था, संविधान धोक्यात आलेले आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते,

error: Content is protected !!