ब्रेकिंग न्युज
जि.प.प्राथ शाळा,तपनेश्वर येथे प्रवेशोत्सव उत्साहातपालखी मिरवणुकीने माऊली दादा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास झाली सुरुवात..छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी चर्चासत्रगेवराई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ; ग्रामस्थ झाले भयभयीत बनावटी औषधे विकणाऱ्यावर माजलगावात फसवणुकीचा गुन्हा दाखलचिंचेवाडीला आत्महत्या ग्रस्थ वायभासे कुटुंबाची जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची भेटशाळेचा पहिला दिवस; स्कुल चले हम चिखल तुडवीत ; गुलाबपुष्प नको निदान धड चालता येईल असा रस्ता तरी द्या :- डॉ.गणेश ढवळेपुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी सुनील लोणकर प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन मेदनकर ; नवीन कार्यकारिणी जाहीरतलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व वायरमन यांनी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतप्रभाग.क्र. १० मधील साचलेल्या कचऱ्याची विल्लेवाट लावा; अन्यथा तीव्र आंदोलन

श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….

श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….

जामखेड प्रतिनिधी;-श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड यांच्यामार्फत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक २५-४-२०२४ ते शुक्रवार दिनांक १०-५-२०२४ पर्यंत जवळपास १५ दिवस शिवकालीन युद्धकला,प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार, भारतीय जोर बैठक भाला,काठी, तलवार,दांडपट्टा, बालसंस्कार,महिला व मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

१५ दिवस चाललेल्या या शिबिरात मुला – मुलींनी स्वसंरक्षणाबरोबर संस्काराचेही धडे घेतले १५ दिवस चाललेल्या या शिबिराचा शुक्रवार दिनांक १०-५-२०२४ रोजी सायंकाळच्या सत्रात समारोप घेण्यात आला.
शिबिर समारोपा प्रसंगी विद्यार्थ्यांनी १५ दिवस शिकलेल्या सर्व प्रकारांचे उपस्थित मान्यवर,पालक तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकांचे बहारदार प्रदर्शन करून उपस्थितांचे मने जिंकली.शिबिरामध्ये जवळपास ९३ मुला – मुलींनी सहभाग घेतला, या शिबिरासाठी तालुका शेवगाव येथील,तीन मुली व दोन मुलांचाही सहभाग होता. शिबिरातील उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शिबिर समारोपाप्रसंगी शिबिर पूर्ण केल्याबद्दल ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे
उद्योजक संतोषशेठ फिरोदिया,विवेक कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख
संजय काशिद , भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ रोहिणी काशिद, दिगंबर राळेभात, पत्रकार धनराज पवार,हृषिकेश मोरे ,मोहित गांधी,विष्णू गंभिरे ,बबलु निकम,
पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या सर्व प्रशिक्षक, प्रशिक्षिका सदस्य,अधिकारी,तसेच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शिबिरासाठी निशुल्क मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रसिद्ध उद्योजक दिलीपशेठ गुगळे, विवेक कुलकर्णी, संतोषशेठ फिरोदिया यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रोहित खुपसे तर आभार प्रदर्शन अमोल निमोणकर यांनी मानले.

error: Content is protected !!