ब्रेकिंग न्युज
जि.प.प्राथ शाळा,तपनेश्वर येथे प्रवेशोत्सव उत्साहातपालखी मिरवणुकीने माऊली दादा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास झाली सुरुवात..छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी चर्चासत्रगेवराई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ; ग्रामस्थ झाले भयभयीत बनावटी औषधे विकणाऱ्यावर माजलगावात फसवणुकीचा गुन्हा दाखलचिंचेवाडीला आत्महत्या ग्रस्थ वायभासे कुटुंबाची जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची भेटशाळेचा पहिला दिवस; स्कुल चले हम चिखल तुडवीत ; गुलाबपुष्प नको निदान धड चालता येईल असा रस्ता तरी द्या :- डॉ.गणेश ढवळेपुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी सुनील लोणकर प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन मेदनकर ; नवीन कार्यकारिणी जाहीरतलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व वायरमन यांनी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतप्रभाग.क्र. १० मधील साचलेल्या कचऱ्याची विल्लेवाट लावा; अन्यथा तीव्र आंदोलन

कुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मान

कुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मान

पुणे आळंदी ) : कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रेची बैलगाडा शर्यतीची मेगाफायनल होऊन कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने पटकावला.
कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रे निमित्त भव्यदिव्य २०-२० कुरुळी केसरी २०२४ बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेमीफायनलसाठी जवळ पास ५८ बैलगाडे सहभागी झाले होते. यापैकी मेगाफायनलसाठी वीस बैलगाडे सहभागी झाले. या शर्यती रात्री उशीरा पर्यंत चालु राहिल्या. यामुळे बक्षीस वितरण देखील उशिरा झाले.
यातील ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने ११.०७ मिली पॅाइट सेकंद यावेळेत पूर्ण केल्याने कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे मानकरी ठरले. तसेच विविध बैलगाड्यांनी बुलेट, हिरो होंडा शाईन, २ स्पेंलेडर व २२ हिरो सीडी डिल्कस या गाड्याचे इनाम पटकावले. या वेळी गाडा मालकाचे व बैलगाडा शौकीनांचे तसेच पहिल्या दिवसीच्या अन्नप्रसाचे वाटप प्रसिध्द उद्योजक भरतशेठ कड, कमलताई भरत कड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका यांचे आभार समस्त ग्रामस्थाच्या व कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने विठ्ठल रुखमिणी सांप्रदाय दिंडीचे अध्यक्ष गुलाबराव विठोबा सोनवणे यांनी मानले.

error: Content is protected !!