ब्रेकिंग न्युज
जि.प.प्राथ शाळा,तपनेश्वर येथे प्रवेशोत्सव उत्साहातपालखी मिरवणुकीने माऊली दादा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास झाली सुरुवात..छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी चर्चासत्रगेवराई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ; ग्रामस्थ झाले भयभयीत बनावटी औषधे विकणाऱ्यावर माजलगावात फसवणुकीचा गुन्हा दाखलचिंचेवाडीला आत्महत्या ग्रस्थ वायभासे कुटुंबाची जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची भेटशाळेचा पहिला दिवस; स्कुल चले हम चिखल तुडवीत ; गुलाबपुष्प नको निदान धड चालता येईल असा रस्ता तरी द्या :- डॉ.गणेश ढवळेपुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी सुनील लोणकर प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन मेदनकर ; नवीन कार्यकारिणी जाहीरतलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व वायरमन यांनी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतप्रभाग.क्र. १० मधील साचलेल्या कचऱ्याची विल्लेवाट लावा; अन्यथा तीव्र आंदोलन

उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..

उष्माघाताने वानराचा मृत्यू ……

गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..

पाण्यासाठी वन्य प्राण्यांची प्राणांकित धडपड !

सुस्तावलेला वनविभाग कधी जागा होणार !

शेवगाव ;-शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे उष्माघाताने एक वानराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि २७ रोजी घडली. ह्या उष्माघाताने मरण पावलेल्या वानरावर गावकऱ्यांनी मनुष्या प्रमाणे अंतिम संस्कार केले.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर गावामध्ये एक वानराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि २७ रोजी घडली. उष्मघातामुळे वानर गेल्या दोन-तीन दिवसांपासून आजारी होते. वानरावर जोहरापूर येथे उपचार ही केले गेले , परंतु वानराच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुर्दैवाने सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन या वानराचा अंत्यविधीचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यानंतर स्वाध्याय हरिनामाच्या गजरात या वानराचा अंत्यविधी जोहरापूर गावातील हनुमान मंदिराच्या समोर करण्यात आला. यावेळी गावातील लहान, थोर, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने यावेळी हजर होते. महिलांना आपले दुःख यावेळी अनावर झाले होते. बबन देवा, व राजू देवा यांनी मंत्र उपचारात वानरसा अंत्यविधी केला.
‌‌ यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सुभाष लांडे, दिनकरराव बडधे, विठ्ठलराव उगलमुगले, शिवाजी ढगे, बाळू काका वाघ, मनोज बडधे, एकनाथ ढगे, महादेव उगलमुगले, माजी सरपंच जालिंदर वाकडे, भीमराज उगलमुगले, पत्रकार रवींद्र उगलमुगले, अशोक सोनवणे, चंद्रकांत वाघ, भास्कर वाघ आदी टाळकरी व भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वानरावर पुढील विधी विधी करण्यात येणार आहेत. अशी ही गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

चौकट
वन विभागाचे दुर्लक्ष !

पाण्यासाठी जंगलातील प्राणी दाही दिशा वन वन फिरत आहेत. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे वन विभागाकडून पाण्याची सोय केलेली दिसत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचे उष्माघाताने मृत्यू होत आहेत . पिण्याच्या पाण्यासाठी वन्य प्राणी मानवी येताना दिसत आहेत. वन विभागाने योग्य वेळी या प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली.

error: Content is protected !!