विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ; जामखेडमध्ये पोलिसांचा रूट मार्च
जामखेड प्रतिनिधी;-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जामखेड शहरातील संवेदनशील ठिकाणे व मिश्र वस्ती भागातून आयटीबीपीचे ४ अधिकारी, ३७ जवान तसेच जामखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी वर्षा जाधव, नंदकुमार सोनवलकर व १५ पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत शनिवारी रूट मार्चघेण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ४०० च्या आसपास लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच शहरातील संवेदनशील व मिश्र भागात शांतता रहावे व भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी यादृष्टीने शनिवारी रूट मार्च जामखेड शहरातून अयोजीत केला होता हा रूट मार्च जामखेड पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन बीड कॉर्नर, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, संविधान चौक, खर्डा रोड, ए वन कॉर्नर, खर्डा चौक, तपनेश्वर रोड, नुराणी कॉलनी, खाडे नगर, एसटी बस स्टँड, नगर रोड, पंचायत समिती व नंतर पोलीस स्टेशनला समारोप करण्यात आला.