ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे शहराध्यक्षपदी प्रदीप जोशी तर सचिवपदी तुळशीराम वाघमारे यांची निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर
तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे शहराध्यक्षपदी प्रदीप जोशी तर सचिवपदी तुळशीराम वाघमारे यांची निवड

गेवराई( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अंकुश आतकरे, शहराध्यक्ष प्रदीप जोशी ,उपाध्यक्षपदी भागवत देशपांडे ,राजेंद्र नाटकर ,तर सचिवपदी तुळशीराम वाघमारे यांची फेरनिवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची दिनांक 11 रोज गुरुवार या दिवशी शासकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या आदेशान्वये व विभागीय प्रदेशाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे दै. सुर्योदय, शहराध्यक्षपदी प्रदीप जोशी दै. सामना, उपाध्यक्षपदी भागवत देशपांडे सायं दै. अभिमान, राजेंद्र नाटकर दै. लोकाशा, सचिवपदी तुळशीराम वाघमारे दै. लोकाशा, सहसचिवपदी अविनाश इंगावले दै. प्रजापत्र, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घाडगे दै. लोकाशा, कोषाध्यक्षपदी सचिन नाटकर दै. प्रजापत्र संघटक पदी विनायक उबाळे दै. लोकमत यांची तर सदस्य पदी शिवाजी ढाकणे संपादक गौरीपूद दर्शन, अमोल वैद्य संपादक बीड राज्यकर्ता, अनिल अंगुडे सायं दै. सरकार, प्रा. रामहारी काकडे दै. चंपावती, दत्तात्रय झेंडेकर दै. हिंदजागृती, नितीन वाकडे दै. झुंजार नेता, सिध्दांत मोरे सायं दै. सिटीजन, सय्यद कौसर दै. जंग, शेख अकबर सायं दै. रिपोर्टर, ज्ञानेश्वर जाधव दै. सुर्योदय यांच्या निवड करण्यात आली. यावेळी संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्कृष्ट काम केले याबद्दल अंकुश आतकरे यांचे कौतुक करून त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित सत्कार करून लवकरच ठाणे येथे होणारे अधिवेशनात सन्मान करणार आहोत अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. तसेच संपादक अमोल वैद्य ज्येष्ठ पत्रकार काझी अमान व राजेंद्र नाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार तुळशीराम वाघमारे यांनी मानले.

चौकट
विभागीय उपाध्यक्ष पदी सुनील पोपळे तर जिल्हा उपाध्यक्ष पदी काझी अमान यांची निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची गेवराई येथील कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष वैभव स्वामी यांनी गेवराई येथील ज्येष्ठ संपादक सुनील पोपळे यांची विभागीय उपाध्यक्ष म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली.

error: Content is protected !!