ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

पुर्व कल्पना न देताच शेतक-यांचे विज कनेक्शन तोडले

पुर्व कल्पना न देताच शेतक-यांचे विज कनेक्शन तोडले
————
शेतक-यासह आ.लक्ष्मण पवारांचे विज वितरण कार्यालयातच आमरण उपोषणा सुरू

तात्काळ विज कनेक्शन जोडून द्या नसता आम्ही जनावरांना पाणी पिण्यासाठी तहसील कार्यालयात घेऊन येणार आसल्याचे संतप्त भावाना शेतक-यांनी व्यक्त केली आहे
—-
गेवराई: विज वितरणच्या आधिका-यांनी कुठलीही पुर्व कल्पना न देता शेतक-यांचे विज कनेक्शन तोडून शेतक-यांची गैरसोय तर झाली आहे पण शेती पंपावर अंबलबुन आसणा-या जनावरांचे सुध्दा पाण्या वाचुन हाल झाले आहेत अशा परिस्थितीत शेतक-यांना दहा दिवसांची मुदत देऊन तात्काळ विज कनेक्शन जोडून द्या अशी मागणी आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे
गेवराई विधानसभा मतदार संघात भाजपाचा आमदार आहे म्हणून अशा प्रकारे शेतक-यांना अडचणीत आणले जात आहे तर जिथे राष्ट्रवादी,काँग्रेस,किंवा शिवसेनेचा आमदार आहे तिथे वेगळे नियम आहेत तर आमच्या बाबतीत वेगळे निर्णय अशा प्रकारे दुजाभाव का? असा सवाल आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी केला आहे तर शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस, याच्या मतदारसंघाला जे नियम आहेत त्या नियमानुसारच आम्हाला दहा दिवसांची मुदत देण्यात यावा अशी मागणी आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी बोलताना केली आहे
विज वितरण प्रशासकीय अधिकारी यांनी विज बिल थकीत असलेल्या शेतक-यांना कुठलीही पुर्व कल्पना न देता अचानक विज कनेक्शन तोडले होते अशी तक्रार शेतक-यांनी आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडे केली होती
अचानकपणे शेतक-यांचे विज कनेक्शन तोडले होते म्हणून आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी आज गेवराई येथील विज वितरण कार्यालयात दाखल होऊन शेतक-यांना दहा दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली होती पण विज वितरण कार्यालयाच्या आधिकारी यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही म्हणून शेतक-यांसह आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी संताप व्यक्त करत अचानक विज वितरण कार्यालयात उपोषण सुरू केले आहे
महाविकास आघाडीच्या सरकारने शेतक-यांना कसल्याही प्रकारची सुचना न देता विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे होता त्या अनुषंगाने आज दि.13 फेब्रुवारी रोजी आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी विज वितरण कार्यालयात येऊन शेतक-यांना दहा दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली पण विज वितरण कार्यालयाच्या आधिकारी यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही म्हणून आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी जो पर्यंत लाईट सुरू करत नाही तो पर्यंत उपोषण मागे घ्यायेचे नाही असा निर्णय घेतला आहे आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्यासह शेकडो शेतकरी उपोषणाला बसले आहेत

error: Content is protected !!