ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यापुढेही दर्जेदार विकास कामे केली जातील- विजयसिंह पंडित

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यापुढेही दर्जेदार
विकास कामे केली जातील- विजयसिंह पंडित
==============
रेवकीत ५७ रु.लक्ष किंमतीच्या विकास कामांचा शुभारंभ
==============
गेवराई, दि.१३ (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सुविधा देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खर्च केलेला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली याचे समाधानही आहे. मौजे रेवकी देवकी आणि परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यापुढील काळातही दर्जेदार विकास कामे केली जातील. बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.सविता बाळासाहेब मस्के यांच्या प्रयत्नातून या भागात विकास कामांना सुरुवात झाली आहे ती कामे दर्जेदार होण्यासाठी आपण विशेष लक्ष घालून आणि या भागाचा कायापालट करू असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. मौजे रेवकी येथे ५७ लक्ष रुपये किंमतींच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी सभापती बाळासाहेब मस्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.सविता बाळासाहेब मस्के यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या मौजे रेवकी येथे ४९ लक्ष रुपये किंमतीचा पुल बंधारा आणि ८ लक्ष रुपये किंमतीच्या जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकामाचे भुमिपूजन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सभापती बाळासाहेब मस्के, ग्रामपंचायत सदस्य विष्णू घोंगडे, शिवाजी काळे, अनिल मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, रेवकी येथे होत असलेल्या या पुलाच्या कामामुळे रेवकी हे गाव देवकी या गावाला जोडले जाणार आहे, त्यामुळे रेवकी आणि देवकी गावातील ग्रामस्थांची रहदारीची अडचण दूर होणार आहे. दैनंदिन कामे आणि इतर व्यवहार होण्यासाठी रस्त्याची अडचण दूर झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मागील चार वर्षांपासून सभापती सौ.सविता बाळासाहेब मस्के या भागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. ग्रामीण भागाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत असतात. आपल्या भागाच्या सर्वांगिन विकास करण्यासाठी मस्के कुटूंबिय प्रयत्नशील असतात. येणार्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी आपण भरघोस निधी उपलब्ध करून देवू सभापती सौ.सविता बाळासाहेब मस्के यांच्या माध्यमातून या भागांचा कायापालट करण्यासाठी आपण विशेष लक्ष घालू असेही ते यावेळी म्हणाले. होणारी कामे दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे असून याकामी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम घेण्यात आला.

error: Content is protected !!