ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली

मुबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम जन्मभूमि येथे भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी देशभरातून निधी संकलनाचे काम सध्या सुरु आहे. या निधी संकलनाच्या अनुषंगानेच आज रा. स्व. संघाच्या काही सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

निधी संकलनासाठी संघाचे सदस्य ‘कृष्णकुंज’वर

याबाबत बोलताना आरएसएसचे सदस्य विठ्ठल कांबळे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणासाठी सध्या देशभरातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. या मोहिमेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली. यावेळी श्याम अग्रवाल, सुरेश बगेरिया, देवकिनंदन जिंदल उपस्थित होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत आवश्यक आहे. ही मदत आम्ही करु, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार

राज ठाकरे 1 ते 9 मार्च या कालावधीत अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. त्यानंतर आपण अयोध्या दौऱ्याचा मानस व्यक्त केला आहे, मात्र तारीख अद्याप ठरलेली नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मनसे आमदाराकडून धनादेश

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश काही दिवसांपूर्वी मदत म्हणून दिला. राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली होती. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाल्याच्या भावना राजू पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.

राम मंदिरासाठी अनेकांकडून देणग्या

राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!