ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गेवराईच्या यशराज सागडे याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

गेवराईच्या यशराज सागडे याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड गेवराई -दि. १५ (प्रतिनिधी ) -१२ ते १४ फेब्रु. २०२१ दरम्यान पन्हाळा , कोल्हापूर येथे संपन्न सब ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेतून गेवराई येथील शारदा स्पोर्टस् अकादमीचा खेळाडू यशराज किसन सागडे याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे . गेवराई जि. बीड येथील शारदा विद्या मंदिरचा इयत्ता १० वीत शिकत असलेला यशराज हा शारदा स्पोर्टस् अकादमीच्या वतीने आर.बी.अट्टल महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर प्रशिक्षक विजय अपसिंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत आहे.बीड जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा निवड चाचणीतून लातूर विभागीय निवड चाचणीत सहभागी झाला होता. त्यातून विभागीय संघात प्रवेश मिळाला. पन्हाळा ( कोल्हापूर ) येथे १२ ते १४ फेब्रु. दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर गट व्हॉलीबॉल निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेतून उत्कृष्ट खेळ केल्याने यशराज सागडे याची तामिळनाडूमध्ये २८ फेब्रु.ते ४ मार्चदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. गेवराई तालुक्यातून राष्ट्रीय व्हॉलीबॉलसाठी निवड होणारा यशराज हा एकमेवाद्वितीय असावा. या अभूतपूर्व यशाबद्दल बीड जिल्हा व्हॉलीबॉल असो.चे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री शिवाजीरावजी पंडित, शारदा स्पोर्टस् अकादमीचे कार्यवाह तथा म.रा. कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आ. अमरसिंह पंडित, बीड जि.प. माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा व्हॉलीबॉल असो.चे सचिव तथा राज्य व्हॉलीबॉल असो.चे उपाध्यक्ष प्रा.गोपाल धांडे, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे, अमृत डावकर,शारदा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, प्रा. राजेंद्र बरकसे,व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक विजय अपसिंगेकर, विजय जाहेर, यशराजचे पिता किसन सागडे, डॉ.केतन गायकवाड, प्रा. रविंद्र खरात, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, जिल्हा व्हॉलीबॉल असो.चे सर्व पदाधिकारी, सदस्य, वरिष्ठ खेळाडू , यशराजचे मूळ गाव भाटेपुरीच्या ग्रामस्थांनी, हितचिंतकांनी यशराजचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

error: Content is protected !!