ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असं अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचं देब यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

आगरतळा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केलं. त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना बिप्लब देब यांनी शाहांचा मनोदय व्यक्त केला.

भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असं अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचं देब यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. रवींद्र सतबर्षिकी भवनात बिप्लब देब यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अमित शाह यांचे नेतृत्व आणि भारताच्या सीमा उल्लंघून भाजपचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनाला देब यांनी दाद दिली.

‘जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा ते त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आले होते. आमची एका गेस्ट हाऊसमध्ये भेट झाली. आम्ही गप्पा मारत होते. तेव्हा भाजपचे उत्तर-पूर्व झोनल सचिव अजय जमवालही होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं जमवाल म्हणाले. तेव्हा अमित शाह म्हणाल होते, की अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत. आपल्याला शेजारी देशांमध्येही पक्षाचा विस्तार करायचा आहे. तिथेही विजय मिळवायचा आहे.’ असं मुख्यमंत्री बिप्लब देब भाजप कार्यकर्त्यांना सांगत होते.

‘ज्यांच्याकडे इतकी ऊर्जा आहे, असा दृष्टीकोन आहे, ते बोलत आहेत की भाजपला जगभरात विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. असा विक्रम फक्त कम्युनिस्टांनी नोंदवला आहे.’ असंही बिप्लब देब म्हणाले.

अमित शाहांवर टीका करणारं शिवसैनिकाचं पत्र

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी शिवसेनेवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक भावनिक पत्र लिहिल्याची अफवा सोशल मीडियावर उठली होती. मात्र हे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिलेलं नसून एका शिवसैनिकाने ते उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचं नंतर समोर आलं. या पत्रात अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांवर निशाणा साधण्यात आला. ‘गुजराती’ गृहमंत्र्यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेला संपवण्याची भाषा केली आहे. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला.

error: Content is protected !!