ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

केज-अंबाजोगाई रोडवर मोटारसायकल -जीपच्या भिषण अपघातात ;होळ येथील दोन तरूण जागीच ठार

केज-अंबाजोगाई रोडवर मोटारसायकल -जीपच्या भिषण अपघातात ;होळ येथील दोन तरूण जागीच ठार

नांदुर घाट प्रतिनिधी-
श्रीकांत जाधव.

केज-अंबाजोगाई रोडवर मोटारसायकल -जीपच्या भिषण अपघातात ;होळ येथील दोन तरूण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे . अधिक माहिती अशी आहे की
अजिंक्य दत्ता धस वय २०वर्षे महेंद्र भीमराव घुगे वय २०, वर्षे दोघेही रा.होळ ता.केज) असे अपघातात मयत झालेल्या तरूणांचे नावे आहेत.

हे दोघे मोटारसायकलवरून (क्र.एम.एच. ४४ व्ही २१८९) लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या जीपला (क्र.एम.एच.२४ व्ही ४४८९) जोराची धडक बसली असता यात अजिंक्य धस यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र घुगे यास अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच महेंद्र घुगे याची प्राणज्योत मालवली व अंबाजोगाई येथील डॉक्टरांनी महेंद्र घुगे याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले.

error: Content is protected !!