ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गेवराई तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच व उपसरपंच यांची निवड

गेवराई तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच व उपसरपंच यांची निवड
=============
गेवराई, दि.१५ (प्रतिनिधी) ः- तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुक झालेल्या सातपैकी चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच आणि उपसरपंच बहुमताने निवडून आले. मादळमोही ग्रा.पं.च्या सरपंचपदी सौ.साक्षी राजेंद्र वारंगे तर उपसरपंचपदी मेहराज बेगम आबुबकर शेख, भडंगवाडी ग्रा.पं. सरपंचपदी अरुणाबाई राधाकिसन नवले, उपसरपंचपदी सोजरबाई अंबादास निकम, जव्हारवाडी ग्रा.पं. सरपंचपदी वैशाली सर्जेराव तावरे, उपसरपंचपदी नंदबाई सुदाम जवरे, कुंभारवाडी ग्रा.पं.सरपंचपदी पांडूरंग शिंदे तर उपसरपंचपदी मुक्ता विष्णू जाधव यांची निवड झाली. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले. गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

गेवराई तालुक्यातील मादळमोही, भडंगवाडी, मानमोडी, मुळूकवाडी, जव्हारवाडी, वंजारवाडी व कुंभारवाडी अशा सात ग्रामपंचायतींच्या सरंपच व उपसरपंचाची निवड सोमवार, दि.१५ फेब्रुवारी रोजी पार पडली. बहुचर्चित मादळमोही ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आणि त्यांच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर येथील सरपंच व उपसरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ.साक्षी राजेंद्र वारंगे यांची सरपंचपदी तर मेहराज बेगम आबुबकर शेख यांची उपसरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध पार पडली. भडंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अरुणाबाई राधाकिसन नवले तर उपसरपंचपदी सोजरबाई अंबादास निकम यांची निवड करण्यात आली. जव्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैशाली सर्जेराव तावरे यांची तर उपसरपंचपदी नंदाबाई सुदामराव जवरे यांची निवड करण्यात आली. कुंभारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पांडुरंग मारुती शिंदे यांची तर उपसरपंचपदी मुक्ता विष्णू जाधव यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीनंतर जल्लोष करून आनंद साजरा केला. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठे यश आले असून मादळमोही जिल्हा परिषद गटातील मादळमोही, भडंगवाडी, जव्हारवाडी, कुंभारवाडी या चारही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. मादळमोही येथे जयभवानीचे संचालक राजेंद्र वारंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिपक वारंगे, माजी सभापती बबनराव मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

error: Content is protected !!