ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

अजंदा रावेर रोडवर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बस व मोटर सायकलची समोरासमोर धडक

अजंदा रावेर रोडवर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बस व मोटर सायकलची समोरासमोर धडक

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

यात झालेल्‍या अपघातात मोटारसायकल स्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. दोघांना पुढील उपचारार्थ दवाखान्यात जळगावला पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्‍य परिवहन महामंडळाची बस एम.एच. 20, बी.एल. 0910. रावेर डेपोची बस सकाळी पावणे आठला रावेर हून अजंदे गावाकडे जात होती.

रावेर पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर नविन विश्रामगृहाच्या मागे वळणवरील खड्डा चुकवण्याच्या नादात बस व अजंदेकडून येणारी मोटरसायकल एम.एच. 19, डि.के 3014. यांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात गोकुळ बाबुराव पाटील, सचिन रमेश पाटील. धामोडी हे गभीर जखमी झाले. तर विठ्ठल बाळू पाटील. राहणार मोहराळा, ता. यावल. हल्ली मुक्काम धामोडी याचा मृत्यू झाला.
याबाबत येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार यांच्या फिर्यादी वरून बसचालक आय. टी. खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहे.
रावेर अजंदे या रस्त्यावरील खड्डयामुळे असंख्य बळी
नवीन विश्रामगृह ते अजंदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून सुमारे अर्ध्या किलोमीटरवर मात्राण नाल्यावर एक पूल आहे. पुलाच्या पलीकडे रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला असून हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात सुमारे चार महिन्यांपूर्वी एक केळीचा ट्रक नाल्यात जाऊन पडला होता आणि दोन युवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिन्याभरातच एक प्रवाशांनी भरलेली ॲपे रिक्षा त्याच ठिकाणी नाल्यात पडली होती.आजच्या अपघातापूर्वी देखील येथेच अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याला वळण असल्याने पलीकडून येणारे वाहन दिसत नाही. झुडपे वाढल्यानेही गंभीर अपघात होतात हे माहिती असूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालेले असल्याचे दिसते. हा विभाग आणखी किती बळी गेल्यावर हा खड्डा बुजवणार आहे? आणि या रस्त्यावरील झुडपे काढणार आहे? तसेच या रस्त्याचे त्या ठिकणी रुंदीकरण करावे असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत.

error: Content is protected !!