ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

घर सील करून घरावर स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती देण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद महापालिकेकडून देण्यात आली

औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. अशात औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे सील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. घर सील करून घरावर स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती देण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद महापालिकेकडून देण्यात आली आहे.

कोरोनाची लस आल्यामुळे सर्व काही पुर्वासारखं सुरू झालं होतं. पण आता कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळे औरंगाबद पालिका आता अॅक्शन मोडमध्ये असून नागरिकांनाही कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने फैलावत आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. पण हा शेवटचा पर्याय असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती आहे.

नाशिकमध्येही लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागल्यामुळे नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

पुण्यात लग्न समारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग
नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अशात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबईतील चार भागात वाढती रुग्णसंख्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

error: Content is protected !!