ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

आम आदमी पक्ष बीडकरांच्या पसंतीस उतरत आहे!

आम आदमी पक्ष बीडकरांच्या पसंतीस उतरत आहे!

युवा पत्रकार अमरजान पठाण यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

बीड (प्रतिनिधी): गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष बीड शहरात नागरिकांच्या समस्यांबाबत चांगले काम करत आहे. विविध यशस्वी आंदोलने, धर्मनिरपेक्ष धोरण, आठवड्याला स्वच्छता अभियान यामुळे बीडकरांच्या मनात आम आदमी पक्षाने स्थान निर्माण केले आहे. काल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, युवक प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, सुग्रीव मुंडे, जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष साजेद यांच्यासह आप पक्षाच्या उपस्थितीत बीड येथे संवाद दौरा संपन्न झाला.
या दौऱ्यानिमित्त बीड येथे आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत युवा पत्रकार अमरजान पठाण यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. अमरजान यांनी आम आदमी पक्ष सध्या बीड शहरात नव्या धोरणासह परिवर्तन घडवण्यासाठी काम करत असून या कार्यात सहभागी होऊन घराणेशाही, भ्रष्टाचार मुक्त सिस्टीम उभी करण्यासाठी या पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. यावेळी पठाण यांच्यासह विद्यार्थी व युवकांनी देखील आपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सर्व पक्षप्रवेशीतांचे स्वागत केले.

error: Content is protected !!