ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

वीज महावितरणचे अधिकारी अंबडकरांचा महाप्रताप ; पाच लाखाच्या बाकीसाठी तोडलेले विजकनेक्शन रात्रीतून जोडून दिले.

वीज महावितरणचे अधिकारी अंबडकरांचा महाप्रताप ; पाच लाखाच्या बाकीसाठी तोडलेले विजकनेक्शन रात्रीतून जोडून दिले.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परळी | प्रतिनिधी
राज्यकर्ते चांगले असतील तर अधिकारी, कर्मचारीही लोकहिताचे कार्यकरतील. परंतु सरकारच उभे राहून लघुशंका करत असेल तर अधिकारी तर रिंगण मारायला कमी करणार नाहीत. त्या प्रमाणे परळीत वीजवितरण अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला असून पाच लाख रुपयाच्या थकित बिलापोटी तोडलेले वीजकनेक्शन २४ तासाच्या आत एक रुपयाही न भरता रात्रीतून जोडून दिले असल्याची माहिती विश्वासने सूत्रांकडून समजले आहे. या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा चांगलीच रंगली असून सर्वसामान्य वीजग्राहकांना महिना-महिना चक्रा मारायला लावणारे अधिकारी राजकीय धनदांडग्यांच्या समोर नांगी कसे टाकतात हे त्याचेच हे उदाहरण आहे परंतु सर्व सामान्य माणसाला मात्र वेगळी वागणूक आणि राजकीय पुढार्‍यांना वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात असून या घटनेने खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी आणि अंबडकर यांना तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी आता होऊ लागली आहे.

सरकारचा कारभार म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे असाच सुरू केला असल्याचे दिसत आहे. परळी शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांकडे जिम साठी वापरलेल्या विजेपोटी पाच लाखाची दोन वर्षापासूनची थकबाकी होती. त्यासाठी वीज कनेक्शन तोडण्यात आले. परंतु ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वीज कनेक्शन तोडण्यात आले होते, त्याच अधिकाऱ्याने १६ फेब्रुवारीच्या अधिकारी अंबडकर यांनी स्वतःच मध्यरात्री कर्मचार्‍यांना घेऊन एक रुपये भरून न घेता वीज कनेक्शन जोडून दिले असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे सध्या शासनाच्या आदेशानुसार थकबाकीदारांचे कनेक्शन तोंडाचे मोहीम जोरात सुरू आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही असे वक्तव्य ऊर्जामंत्री राऊत यांनी केले असून संपूर्ण राज्यभरात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. असे असतानाच आज परळी शहरात मात्र पाच लाख रुपयांची थकबाकी असलेल्या ग्राहकाचे बीज जोडून दिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!