ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

बीडीओ साहेब जिवाचीवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना वाचवण्यासाठी विलंब का ? -गोरख चौरे.

बीडीओ साहेब जिवाचीवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना वाचवण्यासाठी विलंब का ? -गोरख चौरे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

गटविकास आधिकारी पंचायत समिती केज यांना बहुजन क्रांती सेना संघटना मराठवाडा अध्यक्ष गोरख चौरे यांचे तक्रारी निवेदन.

▪️केज | प्रतिनिधी.
तालुक्यातील मौजे  जिवाचीवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी फार मोठ्या प्रमाणात 14 व्या वित्त आयोगामध्ये भ्रस्टाचार केला असल्याचा आरोप बहुजन क्रांती सेना या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोरख चौरे यांनी केला असून त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करुन ग्रामपंचायत ची बॉडी बरखास्तीची मागणी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदना मध्ये पुढे म्हटले आहे की, मौजे जिवाचीवाडी  ता. केज जि. बीड येथील ग्रामपंचायत मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये 14 व्या वित्त आयोगामधील व कामांमध्ये अनागोंदी केली असून सन:  2018 ते 2019 मधील कालावधी मध्ये पाईपलाईन, हौद बांधकाम ,नॅपकिन मशीन, अंगणवाडी दुरुस्ती, दलित वस्तीमध्ये पाईपलाईन व डीपी दुरुस्ती एलईडी व वायरिंग दुरुस्ती ,अंगणवाडी खेळणी बोरवेल वरती लोखंडी पाईप बसवने, व ईतर अशा अनेक कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी करतांना, अपहार व भ्रस्टाचार केला आहे .तरी त्यांच्यावर  गुन्हे दाखल करून सदस्य ,व बॉडी बरखास्त करण्याची मागणी बहुजन क्रांती सेना या संघटनेच्या वतीने मा. गटविकास अधिकारी  पंचायत समिती केज यांच्याकडे केली आहे तसेच निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे.की, ” महारास्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 (1)नुसार सरपंच यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यात यावी. व या कारवाईकडे  संपूर्ण गावाचे व तालुक्याचे लक्ष लागले आहे..

error: Content is protected !!