ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

लाडसावंगी परिसरात गारपीट झाल्यामुळे शेतकयांचे मोठ नुकसान

इम्रान खान/करमाड
औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी परिसरातील मोठी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास या गारपीठ मुळे हिरावला शेतकऱ्याने शेतामध्ये गहू , ज्वारी , हरभरा , डाळिंब , मका इत्यादी शेतामध्ये पीक घेतले होते आता या गारपीटमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हवामानविभागाच्या पुणे वेधशाळेने मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता . बुधवारी दुपार नंतर वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरूवात झाली होती . सायंकाळी लाडसावंगी आणि परिसरात अचानक गारा पडल्या . त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले . याचा फटका आंबा , डाळिंब , मोसंबी आदी फळांनाही बसलाय . ऐन बहरात असलेल्या आंब्याचा मोहर यामुळे गळून पडला आहे.मराठवड्यात अनेक शेतकरी मोसंबी आणि डाळिंब या फळांची लागवड करतात . डाळिंबाला सध्या फुले लागलेली होती . मात्र , अचानक झालेल्या या गारपीटीमुळे डाळिंबाची फुले पडली आहे . आधीच अवकाळी नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आता या गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

error: Content is protected !!