ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गोड साखरे मागची कडू “कहाणी”., मनसेने बंद केली, साखर कारखान्याची “मनमानी”.

गोड साखरे मागची कडू “कहाणी”., मनसेने बंद केली, साखर कारखान्याची “मनमानी”

मनसेच्या बडग्यामुळे पन्नगेश्वर साखर कारखाना ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

प्रतिनिधी उमाकांत पाटील

*पानगाव : पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. पानगाव च्या गळीत हंगाम 2018-19 च्या ऊस बिलाचे पैसे एफ.आर.पी. प्रमाणे मागील तिन वर्षांपासून थकीत होते. या थकित ऊस बिलाच्या रकमेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन वेळोवेळी आंदोलन केले गेले..*

*यात पन्नगेश्वर कारखान्या समोर ठिय्या आंदोलन., रस्ता रोको आंदोलन केले, त्यानंतर परळी येथे माजी मंञी पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या घरासमोर आंदोलन केल्यानंतर साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यावर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्या असे आदेश दिलेले होते., त्यानंतरच 167 रुपये प्रती टनाप्रमाणे रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आली होती.*

*उर्वरीत थकीत एफ.आर.पी च्या रक्कमेसाठी दि. 1 फेब्रुवारी रोजी मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष मा.संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त,पुणे., जिल्हाधिकारी लातुर., तहसीलदार रेणापूर व कारखाना व्यवस्थापण यांना निवेदन देऊन तात्काळ थकीत एफ आर पी ची रक्कम जमा करण्याचे सांगितले होते अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन कारखान्यावर काटा बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी निवेदन देताना कारखाना प्रशासनाने हुज्जत घालून , वाद घालून संतोष नागरगोजे यांच्यासह 5 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.*
.
*सदरील निवेदनाची दखल घेऊन काल दि.16 फेब्रुवारी रोजी उर्वरीत 123 रु प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे…. मनसेच्या सातत्याने केलेल्या या पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 6 कोटी रुपये जमा झाले आहेत.. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असून परिसरातील सर्व शेतकरी बांधव संतोष नागरगोजे यांचे आभार व्यक्त करत आहेत….*

error: Content is protected !!