ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

इदगाहा रोड ते नाळवंडी नाका रस्ता दुरुस्ती न केल्यास रिपाइं च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल- पप्पु वाघमारे

बीड दि. (प्रतिनिधी) :- इदगाह रोड ते नाळवंडी नाका रस्त्याची अत्यंत दैननिय अवस्था झाल्यामुळे नागरीकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. इदगाह रोड ते नाळवंडी नाका परिसरात कॉलेज, शाळा तसेच नाळवंडी परिसरात शेतकरी, विद्यार्थी तसेच नाळवंडी नाका येथे जिल्हा रुग्णालय असल्यामुळे नागरीकांची 24 तास ये जा असते. सदरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झालेले असुन रस्ता दुरुस्तीच्या नावावर संपुर्ण रस्ता मागील एक वर्षापासुन खोदुन ठेवलेला आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावर पाणी व घाणीचे साम्राज्य झालेले आहे. आतापर्यंत अनेकांनी सदरील रस्त्याचे उद्घाटन तसेच पाहणी करुन नागरीकांची दिशाभुल केली आहे. जनतेस वेठीस धरण्याचे काम करत आहे. नगर परिषद बीड यांना वेळोवेळी नागरीकांनी निवेदन देवुनही अद्यापर्यंत कसल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सदरील रस्त्यावर कित्येक वेळा अपघात घडलेले आहेत. इदगाह रोड ते नाळवंडी नाका रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहर सचिव पप्पु वाघमारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
मागील काही दिवसापासुन आम्ही नगर परिषद कार्यालय व प्रशासन यांना भेट घुवन त्यांना वरील मुद्याची माहिती वेळोवेळी दिलेली आहे. परंतु त्यांनी कसल्याही प्रकारची दखल न घेता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.सदरील भागामध्ये वृद्ध, व डिलीवरीसाठी च्या महिला व लहान मुले हे कित्येक वेळेस नाली व रस्त्यावर पडलेले आहेत व त्यांना गंभीर मार लागलेला आहे त्यापैकी कित्येक जणांचे जिव उपचारासाठी जात असतांना गेलेले आहेत. नगर परिषदेच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. सदरील रस्त्यासाठी निधी मंजुर झालेला असतांना वेळेवर केलेले दिसुन येत नाही. सदरील भागामध्ये नागरीकांचे होणाऱ्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासन जिम्मेदार राहील अन्यथा रिपाईच्या वतीने सदरील भागातील संपूर्ण नागरीक रिपाइं चे युवक प्रदेशाध्यक्ष पप्प्पुजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाइं शहर सचिव पप्पु वाघमारे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!