ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ई.श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार

तिरुअनंतपुरम : भाजपकडून विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदारपणे करण्यात येत आहे. मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ई.श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळमध्ये भाजपकडून 21 फेब्रुवारीला विजय यात्रा काढण्यात येणार आहे. त्या यात्रेमध्ये ई श्रीधरन राजकीय प्रवासाला सुरुवात करतील. भाजपचे केरळ प्रदेशाध्यश्र के सुरेंद्रन यांनी ही माहिती दिली.

56 वर्षांची कारकीर्द
ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. सध्या त्यांचं वय 89 वर्षे असून त्यांना 58 वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहेत. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते.

विविध पुरस्कारांनी सन्मानित

ई.श्रीधरन यांना भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केले आहे. फ्रान्स सरकारनं देखील श्रीधरन यांना 2005 मध्ये पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार दिला आहे.

2017 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी नाव चर्चेत

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही. राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत या माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या, असं म्हटलं होते. जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन, असंही ते म्हणाले होते.

दिल्ली मेट्रो ते कोची मध्ये काम
ई.श्रीधरन 2019 मध्ये कोची मेट्रोचे प्रमुख म्हणून काम करत होते. कोची मेट्रोचा प्रकल्प 24 किलो मीटरचा आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या लखनऊ, कानपूर आणि मीरत मेट्रो प्रकल्पासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक सेवेतील प्रकल्प असल्यानं त्याची किंमत लोकांना परवडणारी असावी, अशी भूमिका श्रीधरन यांनी घेतली होती.

ई.श्रीधरन यांच्या नेतृत्वात पाम्बन ब्रीजची पुनर्बांधणी करण्यात आली होती. त्यावेळी ते दक्षिण रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांचं वय 32 वर्ष होते. अवघ्या 46 दिवसामध्ये ते काम पूर्ण करण्यात आले होते. दिल्ली मेट्रोच्या निर्मितीमध्येही ई.श्रीधरन यांनी नेतृत्व केले होते. कोकण रेल्वेशी देखील ते संबंधित होते.

केरळच्या राजकारणाचा विचार करता तिथे सध्या डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे.तर, काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपनं गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये जोर लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना यश आलं नव्हतं. मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला किती फायदा होणार हे पाहावं लागणार आहे.

error: Content is protected !!