ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कळसंबर मध्ये शेवटी नवयुवकांचाच विजय ; एकच आला पण सरपंच झाला.

कळसंबर मध्ये शेवटी नवयुवकांचाच विजय ; एकच आला पण सरपंच झाला.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बीड तालुक्यातील कळसंबर या गावात नवयुवकांनी एकत्र येऊन एक पॅनल उभारला होता.
त्यामध्ये सात पैकी पाच उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी एकच विजयी झाला होता तर बाकीचे चार पराजित झाले.
यावेळेस कळसंबर येथे पहिल्यांदाच तिरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये आजी आणि माजी यांच्याविरोधात तरुणांनी बंड पुकारला होता.
यामध्ये एका पॅनलचे चार तर दुसऱ्या पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले होते. एका पॅनल ला सरपंच पदासाठी सर्व उमेद्वार असतानादेखील तरुणांनी अशी जादूची कांडी फिरवली की एक सदस्य येऊनही सरपंच पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घेतली यावरून स्पष्ट होत आहे की यापुढे राजकारण करताना तरुणांना विचारात घेतले पाहिजे.
कळसंबर मध्ये नवयुवकांची सरपंच पदी सुशिलाबाई धोंडीबा तांगडे तर उपसरपंच पदी ॲड.कर्णराज धर्मराज वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.
तरुणांच्या हाती सत्ता गेल्यामुळे गावाचा विकास कशा प्रकारे होतो याची गावकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

आम्ही नवयुवक विकासाचा मुद्दा घेऊन गावच्या राजकारणात उतरलो होतो त्यामध्ये आमचा एकच उमेदवार विजयी झाला होता दुसऱ्या पार्टीला पूर्ण बहुमत असताना देखील सरपंच पद आमच्या उमेद्वाराला दिले त्याबद्दल पॅनल प्रमुख सतीश वाघमारे माजी सरपंच हनुमंत वाघमारे ज्येष्ठ नागरिक ईश्वर आप्पा वाघमारे उपसरपंच कर्णराज वाघमारे, नंदकुमार धन्वे, योगेश चिंचकर, भीमराव पालक व मतदार बंधू भगिनी या सर्वांचे विश्वास ठेवल्याबद्दल आभार आम्ही विश्वासास पात्र राहून नक्कीच गावचा विकास करू.
-हनुमंत तांगडे पाटील
(पॅनल प्रमुख नवयुवक व ग्राम विकास पॅनल).

error: Content is protected !!