ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भूषण पुरस्कार जाहीर.

कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भूषण पुरस्कार जाहीर.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️ज्ञानेश्वर पाटील | चंदगड.
आज आपण एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याविषयी चर्चा करणार आहोत. त्या म्हणजे चंदगड,गडहिंगलजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर….

प्रत्येक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची दखल ही त्यांच्या कार्यपध्दतीवरुन घेतली जाते.जनतेच्या येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत त्यांचे प्रश्न मार्गी लावणे.आणी प्रशासनवर वचक ठेवून लोकांची सेवा करणे अशा प्रकारचा प्रत्यय प्रांताधिकारी यांच्या कार्यातून चंदगडवाशीयांना आला आहे.चंदगड तालुक्यामधे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रांतअधिकारी विजया पांगारकर यांच नाव नेहमी चर्चेत राहत आहे.

त्यामुळे एकंदरीत त्यांच्या कार्याची दखल घेत यंदाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार हा विजया पांगारकर यांना जाहीर झाला आहे.

मंगळवार दि. २३ रोजी चंदगड पंचायत समितीच्या सभागृहात संध्याकाळी चार वाजता चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मागील ०२ वर्षावर्षी पूरपरिस्थितीत केलेले व्यवस्थापन,पुनर्वसनाचे प्रश्न, कोविड काळात केलेली कामगिरी,शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न,पाणंदमुक्त रस्त्याविषयी घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी विचारात घेऊन चंदगड भूषण समितीने एकमताने अधिकारी विजया पांगारकर यांना हा पुरस्कार जाहीर केला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पकाळात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. महसूल खात्यात येण्यापूर्वी त्यांनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियात काम केले. प्रशासनावर पूर्ण वचक ठेवत जनतेच्या प्रश्नात कायदेशीर चौकट सांभाळताना कायदा व व्यवहार यांची सांगड घालून त्यांनी काम केले आहे. महिला अधिकारी असूनही पुराच्या आपत्तीच्या काळात जनतेच्या मदतीसाठी रात्रंदिवस त्या सक्रिय होत्या. कोविड काळात स्वत माईक घेऊन गावोगावी फिरून लोकांमध्ये जनजागृती केली.पुनर्वसनाचे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळले. त्यांनी केलेल्या कर्तव्यनिष्ठ अलौकिक कामाची दखल घेऊनच ही निवड समितीने करून ‘चंदगड भूषण पुरस्कार’ हा जाहीर केला.
अश्या या कर्तव्यदक्ष अधिकारी विजया पांगारकर यांच्या कार्याला सलाम.

error: Content is protected !!