ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पुण्याच्या ससून रुग्णालयातील एका नर्सला लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

पुणे: पुण्याच्या ससून रुग्णालयातील एका नर्सला लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी या नर्सने कोरोनाची लस घेतली होती. मात्र, तिला कोरोनाची लक्षण जाणवून लागल्यानंतर तिने चाचणी करवून घेतली होती. यावेळी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

या गोष्टीमुळे सध्या ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) मुरलीधर तांबे यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या नर्सला कोरोनाची लागण झाली असली तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे मुरलीधर तांबे यांनी सांगितले.

नाशिकमध्येही लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हील रुग्णालयातही असाच एक प्रकार समोर आला होता. सिव्हिल रुग्णालयातील फार्मासिस्टने कोविड प्रतिबंधक लस घेतली होती. मात्र, लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी तो कोरोना बाधितांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी करवून घेतली. तेव्हा त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात कोरोनाची लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे ही घटना घडली होती. मृत व्यक्तीचे नाव महिपाल असून ते रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कामाला होते. 16 जानेवारीला महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. त्यानंतर महिपाल यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

फेब्रुवारीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ: अजित पवार
1 फेब्रुवारीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आणि डिस्चार्जची संख्या जास्त, अशी परिस्थिती होती. एक फेब्रुवारीनंतर आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या अमरावती विभागात जास्त दिसत आहे. नागपूर, वर्धा, नाशिक विभागातही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणचा आढावा घेतला.” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. दुपारी बैठकीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्या बैठकीत अमरावती, अकोला, यवतमाळ या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा होईल. फक्त तीन शहरं की ग्रामीण भागातही निर्बंध लावायचे याबाबत चर्चा करणार. कोणी मास्क वापरत नाही, त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. सगळे जण कोरोना कमी झाला, असं म्हणून पूर्वीसारखं राहत आहेत.” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!