ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

जाणता राजा

जाणता राजा

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत

धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् आणि जेथे जेथे धर्माचरणाच्या ऱ्हास होतो आणि या धर्माचे वर्चस्व होते त्या त्या वेळी भगवंत अवतीर्ण होतो. तसेच देवरूपी महापुरुष जन्म घेतात असाच एक अवतार छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी माता मा जिजाऊ यांच्या पोटी जन्म घेतला. शिवरायांचा जन्म इसवी सन सोळाशे 60 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यावेळी वडील शहाजीराजे हे गोवळकोंड्याच्या बादशहा आदिलशहाकडे जहागिरी(नोकरी) करत होते. त्याकाळी दिवस फार कठीण होते. मा जिजाऊ ने शिवबाला आपल्या कुशीतच घडविले होते. पुत्र व्हावा ऐसा गुरु गुंडा त्याचा त्रीलोकी लागो झेंडा अशा राजरत्नास जन्म दिला त्याकाळी विविध प्रांतात जुलूम आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या धर्मांधांची सत्ता होती. ते सतत रयतेवर अन्याय अत्याचार करीत असत जनता गुलामीचे जिणे जगत होती. मा जिजाऊ रयतेवर होणारा अन्याय अत्याचार उघड्या डोळ्यांनी निमूटपणे पाहत होत्या. मा जिजाऊ नी बालपणीच शिवबाला सुसंस्कारीत केले होते घोड्यावर बसणे, डोंगर-दऱ्या चढणे, दांडपट्टा चालविणे तलवार चालविणे. युद्धनीती डावपेच आखणे राज्यकारभार चालविणे बाळकडू अमृत पाजले होते.

अन चमत्कार झाला.:-

अवघ्या सोळाव्या वर्षी शिवबाने हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्री ची इच्छा मनात घेऊन अवघ्या पाच पन्नास संवांगड्यासह रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन भीष्मप्रतिज्ञा केली. आणि हर हर महादेवाची गर्जना करीत डोंगरदऱ्यात दुमदुमली की, लढ्यानंतर स्वराज्यासाठी आणि मरेन तर रयतेसाठी आणि पहिली स्वारी झाली. ती तोरणा गड सर करण्याची आणि तेथूनच विजयाची घोडदौड सुरू झाली.

:जाणता राजा : हे बिरुद खरे छत्रपतींनाच शोभते:-

एक आदर्श शीलवान राजा गोरगरीब जनतेचे कैवारी, होते त्यांची कुशाग्र बुद्धी होती. खरी राजनीति करण्याची क्षमता, योग्य न्याय देण्याची क्षमता, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, तसेच सर्व धर्माविषयी आदर, युद्धनीती, डावपेज, युक्त्या व कसं समय सूचकता इत्यादी गोष्टी शिकावं तर शिवबा कडूनच.इतरांना मानसन्मान वागणं समाजाची नाळ जोडणं देशभक्ती देशाभिमान संस्कृतीचं जतन करणं इत्यादी. गोष्टी शिवबांनी स्वतःच्या जीवनात अमलात आणल्या म्हणूनच त्यांना जाणता राजा हे बिरुद शोभून दिसते.

सर्वधर्मसमभावाची जपणूक केली:- शिवाजी महाराजांनी कधीच कोणाच्या धर्माविषयी अथवा जाती विषयी द्वेष केला नाही. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला संरक्षण दिले. त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक जाती धर्मांचे पंथांचे लोक होते. यांच्या कर्तुत्वा प्रमाणे त्यांना कामगिरी दिली गेली. व मानसन्मान वागवले तसेच अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात कठोर पावले उचलली. जेव्हा जेव्हा रयतेवर अन्याय अत्याचार झाला त्या त्या वेळी त्यांनी गरीब,-श्रीमंत जवळचा, परका असा कधीच फरक केला नाही. अ सामान्य माणसे अशीच असतात. त्यांनी वेळीच न्यायनिवाडा करून प्रसंगी कठोरही शिक्षा केल्या परस्त्री मातेसमान:-

शिवाजीराजांनी या देशातील प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक दिली. तसेच ज्या ज्या स्त्रियांनी धाडसाची कामे केली त्यांचा गुणगौरव केला. अशाच एका युद्धप्रसंगी एका शत्रूची मुलगी सैनिकांनी पकडून शिवराया समोर उभी केली. असता तेव्हा शिवराय मुलीकडे पाहून म्हणाले अशीच माझी आई सुंदर असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो. त्यांनी त्या मुलीला आपली बहीण मानून तिचा मान सन्मान केला तिला साडी-चोळी करून तिच्या घरी सन्मानाने पाठविले. किती हा उदात्त पणा

शिवाजी राजा सारखा दुसरा राजा होणेच नाही:- शिवरायांनी अवघ्या अल्पावधीत रयतेला गुलामगिरीतून मुक्त केले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे झाले. जगभर त्यांचा नावलौकिक झाला राजा असावा तर असा शिवाजी महाराज अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी जाणले होते की, आपणाला शत्रूपासून दोन गोष्टीकडून धोका आहे. तो म्हणजे सागरी मार्ग व दुसरा भूमार्ग म्हणून शत्रूपासून संरक्षण मिळवायचे असेल तर प्रथम आपणास सागरी किल्ले व भुईकोट किल्ल्याची बांधणी करावी लागेल. म्हणून त्यांनी सर्वप्रथम अतिदुर्गम भागात डोंगरी किल्ले व सागरी किल्ले बांधले. कितीही कुशाग्र बुद्धी.

शिवाजी महाराज जन्माला यावेत:- मित्रहो आज देशात अन्याय,अत्याचार वाढला आहे. भ्रष्टाचाराने चाराने कळस गाठला आहे. बळी तो कान पिळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जो तो दंडेलशाही लोकशाहीची भाषा करतोय, सर्वसामान्य जनता अन्याय अत्याचाराच्या ओझ्याखाली वाचली आहे. बेकारी उपासमार वाढली आहे. सत्याला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. म्हणून पुन्हा आठवण येते ब शिवरायांची कि,राजे या पुन्हा जन्माला या आणि आम्हाला आम जनतेला व देशाला या गुलामगिरीतून वाचवा. परंतु मित्रांनो शिवबा पुन्हा येणार नाहीत परंतु आम्ही सर्व शिवबासारखे बनवून या मातृभूमीला रयतेला या देशाला संकटातून वाचवू व देशाचे संरक्षण करून हा देश कसा सुजलाम सुफलाम शल्य शामालंम होईल अशा प्रकारची प्रतिज्ञा करू हीच खर्‍या अर्थाने शिवजयंती निमित्त शिवचरणी प्रार्थना.

श्री. खरात.आर.जी सेवानिवृत मुख्याध्यापक

मोबाईल नंबर. 88 30 70 30 23

error: Content is protected !!