ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

वीरेंद्र सेहवागने छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं

मुंबई : संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह ओसांडून वाहत आहे. कोरोनाचं सावट असलं तरी शिवभक्तांध्ये जयंतीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे तसेच राजेंची महती ट्विटमधून विषद केली आहे.

वीरेंद्र सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, “इतिहास आपल्याला सांगतो की शक्तिशाली लोक शक्तिशाली स्थळांवरुन येतात. पण इतिहास चुकीचा होता! सामर्थ्यवान लोक शक्तिशाली स्थळं बनवतात…”

छत्रपती शिवरायांना माझं वंदन… जय माँ भवानी, असा नाराही त्याने आजच्या जयंतीदिनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसंच शिवरायांचा अश्वावर आरुढ झालेला एक फोटो सेहवागने ट्विट केला आहे.

राज्यात तसंच देशात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी शिवाजीराजांना अभिवादन केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी शिवजयंतीदिनी ट्विट करत राजेंच्या चरणी त्रिवार अभिवादन केलं आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा सोहळा
आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरविणार असल्याचे सांगितले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

error: Content is protected !!