ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गेवराईत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

गेवराईत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
==========
गेवराई, दि.१९ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आज गेवराई शहरातील शास्त्री चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजक तथा माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करुन अभिवादन करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी महिला व नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे संस्थापक विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या वतीने दरवषी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात येतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयसिंह पंडित यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त छत्रपती शिवाजी महारांजाच्या अभिवादन समारंभाचे आयोजन केले होते. शुक्रवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शास्त्री चौक गेवराई येथे विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते महाआरती करुन महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत असमंत दुमदुमून टाकला. शिवजन्मोत्सव सोहळा समितीने विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले. भगव्या ध्वजामुळे शास्त्री चौकात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले. सामाजिक अंतर राखून सर्व शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केले. यावेळी समितीच्या वतीने उपस्थित शिवप्रेमी महिला, पुरुष नागरिक आणि पदाधिकारी
यांना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या अभिवादन समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे जगन्नाथ शिंदे, जालिंदर पिसाळ, नगरसेवक राधेश्याम येवले राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर कांडेकर, कार्याध्यक्ष दिनेश घोडके, सहकार्याध्यक्ष, ऋषिकेश मोटे, उपाध्यक्ष युवराज नागरे, आनंद दाभाडे, नविद फारुकी, सचिव सय्यद नौशाद, सहसचिव किरण सुतार, कोषाध्यक्ष अमित वैद्य, सहकोषाध्यक्ष विजय सुतार यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!