ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिलं

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचलाय. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन सुरु झालेलं हे वाकयुद्ध अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही. मिटकरी आणि पडळकर यांच्यातील वादात आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे.

अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. इतकच नाही तर आम्ही सगळं केलं पण सामान्य माणसांचे खिके कापले नाहीत, असा पलटवारही खोतांनी लगावला आहे. “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. त्याला आता खोतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मिटकरींचं पडळकरांवर टीकास्त्र
“मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही”, असा घणाघात मिटकरी यांनी केलाय. “तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोलाही मिटकरींना लगावला होता.

पडळकर आणि मिटकरींमधील वाद
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी यांच्यात वाद सुरु झाला. गोपीचंद पडळकर यांनी अमोल मिटकरी यांचा बाजारू विचारवंत असा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसही होळकर घराण्याच्या विरोधात असून होळकर घराण्याचा इतिहास पुसून टाकण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास जाणूनबुजून वेळ लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

त्यावेळी अमोल मिटकरी यांनीही पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पडळकर म्हणजे बिरोबाची शपथ घेऊन समाजाला विकणारा नेता आहे, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांचा समाचार घेतला. पडळकरांना कावीळ झाल्याने त्यांना सर्वत्र पिवळं दिसत आहे. पडळकर हे पिसाळलेल्या प्रवृत्तीचे असून ते भाजपला बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. पडळकरांनी चोरासारखं पुतळ्याचं अनावरण केलं. आम्हीच होळकरांचे वारसदार असून पडळकर हे आधुनिक शिशूपाल आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

error: Content is protected !!