ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

अफगाणिस्तानमध्ये 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.

काबुल : असं म्हणतात की जो कुणी वाईट काम करतो त्याला आपल्या चुकीच्या कामाची शिक्षा मिळते. हे प्रत्येकवेळा खरं होतंच असं नाही, पण अफगाणिस्तानमध्ये एका घटनेबाबत हे खरं ठरलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी एका मशिदीत बॉम्ब बनवत होते. सोबतच इतरांना याचं प्रशिक्षणही देण्यात येत होतं. हे करत असताना या तालिबानी बॉम्ब क्लासमध्येच बॉम्बस्फोट झाला आणि 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय. ही घटना अफगाणिस्तानमधील बाल्ख प्रांतातील आहे. अफगाणिस्तान सैन्याने या घटनेला दुजोरा दिला असून मृतांमध्ये 6 जण परदेशी नागरिक असल्याचंही म्हटलं.

अफगाणिस्तान सैन्यानं म्हटलं आहे, “तालिबानी दहशतवाद्यांच्या एका गटाला दौलताबाद जिल्ह्यातील क्वाल्टा गावात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाला आणि त्यात तेथे उपस्थित असलेल्या 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे.” स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या अहवालानुसार, तालिबानी दहशतवादी गावातील एका मशिदीत जमा झाले होते. तेथे त्यांना रस्त्यावर पेरण्यात येणाऱ्या आयडी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं.

अशा घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात दहशदवाद्यांच्या मृत्यूची पहिलीच घटना

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान म्हणाले, “स्फोटानंतर घटनास्ळावर कुणीही जीवंत राहिलेलं नाही. हा एक मोठा आणि धोकादायक स्फोट होता. आधी या प्रकारच्या घटनांमध्ये 6, 8 किंवा 10 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावेळी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेलेत.” दुसरीकडे दहशतवादी संघटना तालिबानने या घटनेला दुजोरा दिलाय. असं असलं तरी तालिबानने या स्फोटात त्यांचे किती दहशतवादी मारले गेले यावर अवाक्षरही काढलेलं नाही.

error: Content is protected !!