ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं
युवा वॉरियर्स अभियानात बोलताना त्यांनी भेशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं सांगितलं. तसंच आपला सगळ्या मुस्लिलांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं सांगितलं. मात्र काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

मोदींनी मुस्लीम महिलांच्या पायातली बेडी तोडली
मोदींनी मुस्लिम समाजतल्या महिलांच्या पायातली बेडी तोडली. तीन तलाकचा कायदा रद्द केला. बिहारच्या विजयाच्या विश्लेशन केलं तर लक्षात येईल की बिहारच्या मुस्लिम महिलांनी मोदींना रांगेनं मतदान केलं.

बिहारमध्ये मुस्लीम महिलांमुळे भाजपच्या जास्त जागा
का तर यांनी आपल्या पायातली बेडी तोडली नाहीतर याअगोदर आपला नवरा तलाक तलाक तलाक म्हणून घराबेहर हाकलायचा…. बिहारमध्ये मुस्लिम मॅजोरिटी असलेला सीमांतमध्ये 29 पैकी 14 जागा भाजपला मिळाल्या. याच भागातल्या महिलांनी आपापल्या नवऱ्यांना सांगितलं… तुमको क्या करना है करो हमको मोदीजी को मतदान करना हैं…, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

error: Content is protected !!