ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

माहिती अधिकाराचा प्रभावी वापर समाजाला न्याय देऊ शकतो-ॲड.अजित देशमुख.

माहिती अधिकाराचा प्रभावी वापर समाजाला न्याय देऊ शकतो-ॲड.अजित देशमुख.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
माहिती अधिकार कायद्याचा वापर नागरिकांनी केवळ माहिती घेण्यापूरता मर्यादित न केल्यास त्याचा प्रभावी वापर होऊ शकतो. समाजाला न्याय मिळवून देण्याची ताकद माहिती अधिकारात असून यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने पुढे येणे आवश्‍यक असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

बीड जिल्हा विधी सेवा प्रधिकरण आणि सावरकर महाविद्यालय बीड यांच्या वतीने “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्रीमान गोडबोले साहेब हे होते. तर बीड जिल्हा वकील संघाचे सचिव अँड. नरेंद्र कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य विजेंद्र चौधरी यांचे सह प्राधिकरण्याच्या अधीक्षक श्रीमती देशपांडे मॅडम, प्रा. राजेंद्र भुसारी, झरीकर सर आणि इतर यावेळी उपस्थित होते.

या वेळी न्यायमूर्ती एस. एन. गोडबोले यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे दिल्या जाणार्‍या विविध योजना, लैगिंक कायदा आणि तृतीय पंथीया विषयीचा कायदा याची माहिती सांगितली. या कायद्या विषयी विद्यार्थ्यानी माहिती घेवुन त्याचा प्रसार समाजात करावा, असे आवाहन त्यानी केले. अँड. नरेंद्र कुलकर्णी यानी सेवा अधिनियम कायदा सविस्तर पणे सांगितला. प्राचार्य विजेंद्र चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोकसेवक आणि लोक प्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. ते जनतेसाठी नेमके काय करतात, हे प्रत्येक नागरिकांना जाणून घेण्याची अधिकार कायद्याने प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी माहितीचा अधिकार जास्तीत जास्त प्रमाणात वापरला गेला पाहिजे. शहरातच नव्हे तर ग्रामपातळीवर देखील माहिती अधिकाराचा एक – एक प्रामाणिक कार्यकर्ता तयार झाला तर विकास कामांना दिशा मिळेल आणि कायद्याचा खरा उद्देश साध्य होईल, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले.

माहिती अधिकारामुळे कॉपीमुक्त परीक्षा, निवडणूक घोटाळा, बोगस पीक विमा, रेल्वे घोटाळा प्रकरण, असे किती तरी प्रकरणे मार्गी लागलेली आहेत. शासनाचे हजारो कोटी रुपये माहिती अधिकारामुळे वाचले असून देश पातळीवर अनेक जण या कायद्याचा सकारात्मक वापर करत आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.

पर्यवेक्षक नंदकिशोर झरीकर, विभाग प्रमुख शशिकांत पसारकर, भास्कर पाटील उपस्थित होते. श्री. रमण कुलकर्णी यानी पद्य सादर केले. सुत्रसंचलन व प्रास्ताविक शशिकांत पसारकर यानी केले. कार्यक्रमाचे प्रा. दीपक देशमुख यानी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी वृृृंद मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!