ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कर्जतमध्ये शिवउद्यान व जिजाऊ उद्यानाचे बीजारोपण.

कर्जतमध्ये शिवउद्यान व जिजाऊ उद्यानाचे बीजारोपण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कर्जत | प्रतिनिधी.
कर्जत येथे छ. शिवाजी महाराजाच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत शहरात शिवउद्यान व जिजाऊ उद्यान उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला, यासाठी वृषारोपन करून शिवउद्यानाचे बीजारोपण करण्यात आले. विश्वाचे प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात पार पडला
कर्जत मध्ये छ. शिवरायांच्या विचारांची बांधिलकी जोपासत सामाजिक हित व वृक्ष संगोपन, संवर्धन करण्याचा उद्देश समोर ठेवून, सकल मराठा समाज कर्जत तालुका, यांच्या बरोबर कर्जत शहरात गेली 140 दिवस श्रमदान करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगरपंचायत यांनी एकत्र येऊन शिव उद्यान तसेच जिजाऊ उद्यान तयार करण्याची मुहूर्तमेढ रोवली. याचे बीजारोपण आज वडाचे झाड लावून करण्यात आले. प्रथमतः छ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. या उद्यानाच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी सकल मराठा समाजाने घेतली असून सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगर पंचायतने सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. छ. शिवाजी महाराज जयंतीचा होणाऱ्या खर्चामध्ये शास्वत, पर्यावरण पुरक व सामाजिक बांधीलकी जोपासणारा उपक्रम हाती घेऊन शिव जन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शिव उद्यान हे राशीनरोडवरील निलंगे मळा येथे तर जिजाऊ उद्यान बालाजी कॉलनी येथे संकल्पीत असून या प्रसंगी विलास निलंगे व सुधीर भापकर यांच्या सह सर्व श्रमप्रेमीच्या उपस्थितीत वृक्षारोपन करण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने शिव जयंतीच्या खर्चातुन एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भेट या उद्यानासाठी देण्यात आली, हा चेेेक सकल मराठा समाजाचे समन्वयक दिपक काळे, ऍड धनराज रानमाळ, ऍड दीपक भोसले, डॉ स्वप्नील तोरडमल, तानाजी पाटील, राहुल नवले, काकासाहेब काकडे, प्रसाद कानगुडे, यांच्या हस्ते मुख्याधिकारी गोविंद जाधव व श्रमप्रेमी यांचे कडे सुपूर्द करण्यात आला, याप्रसंगी सर्वाना माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली.

error: Content is protected !!