ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे थाटात अनावरण; सिल्लोड येथे पार पडला दिमाखदार सोहळा.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे थाटात अनावरण; सिल्लोड येथे पार पडला दिमाखदार सोहळा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

शहरातील इतर चौकांचेही लवकरच सुशोभीकरण- राज्यमंत्री अब्दुल सत्तार.

▪️सिल्लोड | प्रतिनिधी.
दि.20 सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शास्त्रीनगर भागात तलाठी भवन जवळ उभारण्यात आलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे अनावरण राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुक्रवार ( दि.19 ) रोजी थाटात संपन्न झाले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. कोरोना संकट मुळे बरेच विकास कामे रखडले असे असले तरी शहरातील ईतर चौक सुशोभीकरण कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे ना. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, बांधकाम सभापती किशोर पाटील बलांडे , सेवा निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, नगराध्यक्षा राजश्री निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल,न.प. मुख्याधिकारी सैय्यद रफिक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शहरात भव्य दिव्य असा महाराजांचा चौक असावा असा संकल्प राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता त्याच अनुशंगाने शहरातील शास्त्री कॉलोनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काम सुरू करण्यात आले. काम पूर्ण झाल्याने महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या भव्य दिव्य चौकाचा अनावरण सोहळा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला.

या अनावरण सोहळ्यासाठी नगर परिषदेने जयत अशी तयारी केली होती. फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षक विद्युत रोषणाई व जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला होता.
हा ऐतिहासिक क्षण अनेकांनी आपल्या कॅमेरात टिपला तर सिल्लोड शहर वासीयांसाठी हा चौक सेल्फी पॉईंट ठरला.

शिव पार्कच्या कामाला एप्रिल मध्ये होणार सुरुवात

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास विभाग अंतर्गत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात शिवपार्क व भीमपार्क उभारण्यात येणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात या कामाला सुरुवात होईल असे ना. अब्दुल सत्तार याप्रसंगी म्हणाले. सिल्लोड शहरातील इतर चौकाचे लवकरच सुशोभीकरण कामाला सुरूवात होणार असून आपले शहर स्वच्छ ,सुंदर, हरित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहभागी होवून सहकार्य करावे तसेच यावर्षी शिव जयंती वर कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमांचे पालन करण्याचे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमास सिल्लोड तालुका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, सहकार्याध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, आशिष कटारिया, स्वागताध्यक्ष संजय पा.फरकाडे, सहस्वागताध्यक्ष विश्वास दाभाडे, महासचीव संजय आरके, शेख बाबर, तसेच गौरव सहारे, सचिव धैर्यशील तायडे, कोषाध्यक्ष अक्षय मगर, सहकोषाध्यक्ष प्रतीक सुधाकर पाटील, उपाध्यक्ष दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, गणेश ढोरमारे, सुधाकर बनकर , सहसचिव गजानन जैस्वाल, संजय मुरकुटे, दत्ता कुडके, जब्बार टेलर, बाळासाहेब वाघ यांच्यासह पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सतीश ताठे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, राजू गौर, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, चांद मिर्झा, सुनील दुधे, रईस मुजावर, रतनकुमार डोभाळ, सुधाकर पाटील, राजू गौर, शेख मोहसीन, जितू आरके, आसिफ बागवान,मनोज झंवर, जुम्मा पठाण, मतीन देशमुख, सत्तार हुसेन आदिंसह शिवभक्तांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!