ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

श्रीकांत गायकवाड उपविभागीय अधिकारी यांच्या मालमत्तेची चौकशी करा-ॲड.चंद्रकांत नवले.

श्रीकांत गायकवाड उपविभागीय अधिकारी यांच्या मालमत्तेची चौकशी करा-ॲड.चंद्रकांत नवले.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड माजलगाव हे नोकरीला लागल्यापासुन आता पर्यंतची त्यांच्या मालमत्तेची चौकशी करुन सदरील मालमत्ता शासन जमा करावी, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे व भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत. माजलगांव येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना दिनांक 18.02.2021 रोजी रात्री 9 ते 10 वा. दरम्यान वाळुच्या प्रकरणात लाच घेतांना पकडण्यात आलेले आहे. गायकवाड हे एक उच्च पदस्त अधिकारी असून अशा अधिकाऱ्यांनी वाळुच्या प्रकरणात लाचखोरी करणे हे जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने निंदणीय आहे. तसेच श्रीकांत गायकवाड हे अत्यंत उद्धट व बेजबाबदार अधिकारी असून लोकप्रतिनिधी व अभ्यंगताशी चांगले वागत नाहित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणुक देतात अशा व्यक्तिला या पदावर राहण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या मालमत्तेची नोकरीला लागल्यापासून आजपर्यंतच्या मालमत्तेची चौकशी करुन बेहिशोबी मालमत्ता तातडीने शासन जमा करण्यात यावी. आमच्या तक्रारीचा गांभीर्यपूर्वक विचार करण्यात यावा. निवेदनात सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!