ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कोरोना साथीरोगाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कोरोना साथीरोगाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. भाजप नेते भांबावले असून ते कोरोनावर राजकारण करत आहेत. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिसत नाही, मग दिल्लीतून कोरोना महाराष्ट्रात पाठवला जातोय का? असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.

नाना पटोले म्हणाले, “जनतेच्या आरोग्य सुविधाबाबत सरकार सकारात्मक आहे. मग भाजप का राजकारण करते? उत्तर प्रदेश, गुजरात या मोठ्या राज्यांमध्ये संख्या दिसतच नाही. दिल्लीतून कोरोना महाराष्ट्रात पाठवला जातो का? हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या कोरोणावर राजकारण करू नका. भाजप नेते भांबावले आहेत.”

“डिझेल-पेट्रोलच्या महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून इतर प्रश्न उपस्थित”

“डिझेल पेट्रोल महाग झालाय. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप इतर प्रश्न उपस्थित करत आहे. जे टीका करतात त्यांना गुजराती समाज आपल्या खिशात आहे असं वाटतंय. आमच्या गुजराती सेलचा मेळावा होता. देशात गुजराती समाजाचं काम कसं सुरू आहे. त्याबाबत मेळावा होता, पण हाच समाज त्यांना धडा शिकवीन,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“स्थानिक आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल”

“महाविकास आघाडीचा उद्देश भाजपला दूर ठेवणे हा होता. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. स्थानिक आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल,” असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीवरील चेंडू पटोले यांनी कार्यकर्त्यांकडे टोलावला आहे.

“देशापेक्षा कोणी मोठं नसतं”

नाना पटोले म्हणाले, “देशाची सुरक्षा धोक्यात आलीय. देशापेक्षा कोणी मोठं नसतं. भाजप देशाचं वस्त्रहरण करत आहे. देश विकायला निघाले आहेत. भाजपवाले काहीही बोलत आहेत. चंद्रकांत पाटील काहीही बोलतात. त्यांना काहीही बोलायचा अधिकार आहे.”

“भाजप घुसखोरांना पक्षाचा पदाधिकारी कसं करतं?”

“उत्तर मुंबईचा भाजप अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष बांगलादेशी घुसखोर आहे. त्याचं नाव रुबल शेख असून त्याच्याविरोधात पनवेलमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. गायीचं मास निर्यात करण्याची टोळी पकडली, त्यातही भाजपचे पदाधिकारी सापडले. अमित शाह यांना थेट प्रश्न आहे, की भाजपकडे आलेला वाल्या वाल्मिकी होतो आणि दुसऱ्याकडे तो देशद्रोह हा काय प्रकार आहे? तुम्ही घुसखोरांना पक्षाचे पदाधिकारी का करतात याचा विचार करा,” असंही त्यांनी नमूद केलं.

error: Content is protected !!