ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा व संघटनेच्या पक्ष कार्यालयाचा शुभारंभ.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा व संघटनेच्या पक्ष कार्यालयाचा शुभारंभ.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️केज | प्रतिनिधी.
दि.20 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी ,महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना व एकल महिला संघटना ,केज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 फेब्रुवारी 2021 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता शिक्षक पतपेढी सभागृह ,केज येथे शेतकरी स्वयंसहायता बचत गट ,कृषि प्रक्रिया उत्पादक कंपनी ,विविध महिला बचत गटांचा संयुक्त शेतकरी मेळावा आयोजित केला असून यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या केज विधानसभा मतदार संघाच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ देखील संपन्न होणार असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली. शेतकरी स्वयंसहायता बचत गट विविध महिला बचत गट कृषी प्रक्रिया उत्पादक कंपनी यांचा संयुक्त मेळावा घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्थानिक व्यवसाय उभा करण्यासाठी शेतकरी गटातील सदस्यांना स्थानिक व्यवसाय करण्यास प्रयत्न करण्यात येणार आहेत . या कार्यक्रमाला शेतकरी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, संघटना जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर,अशोक गित्ते,जिल्हा उपाध्यक्ष अमित नाटकर, प्रमोद पांचाळ,विश्वास जाधव, बिभीषण इंगळे, भागवत पवार, एकल महिला संघटनेच्या मीरा नाईकवाडे-तुपारे ,वच्छला शिंगारे ,तारा घोडके ,लता सावंत, योगेश शेळके, दत्ता भाऊ गंगणे, महेश गंगणे,अभिजीत लोमटे , सुग्रीव करपे,नवनाथ काकडे, धर्मराज देवमाणे,युवा शेतकरी नेते फिरोज खान पठाण चंद्रकांत आंबाड यांनी केले आहे.

error: Content is protected !!