ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

बीड तालुक्यात सहाशे पाच घरकुल मंजूर तर एकशे त्र्याहत्तर अर्ज अपात्र- लाच देऊ नका- अँड. अजित देशमुख

बीड तालुक्यात सहाशे पाच घरकुल मंजूर तर एकशे त्र्याहत्तर अर्ज अपात्र- लाच देऊ नका- अँड. अजित देशमुख
बीड : प्रतिनिधी
बीड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन दोन २०२०/२१ या वर्षामध्ये सहाशे पाच घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या कारणांनी सध्या अपात्र ठरलेल्या अर्जदारांच्या अर्जाची संख्या एकशे त्र्याहत्तर एवढी आहे. घरकुलाची ही योजना शासनाची योजना आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची लाच देण्याची गरज नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कोणालाही लाच देऊ नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२०/२१ या कालावधीसाठी ही घरकुले मंजूर झाली आहेत. ज्या लोकांना ही घरकुले मंजूर झालेली आहेत, त्यांनी आपले काम पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

मंजूर घरकुल पैकी काळेगाव – ४३, ढेकनमोहा – ४२, कुकडगाव – ३९, बेलूरा – २४,तांदळवाडी घाट – १९, पालसिंगण – १९, साखरे बोरगाव – १८, उंबरद जहांगीर – १८, महिंद्रा – २०, करचुंडी – १६, याप्रमाणे या नऊ गावात २४० इतकी घरकुल मंजूर झालेले आहेत. या गावांना जास्त प्रमाणात लाभ मिळालेला आहे.

त्याखालोखाल अंथरवण पिंपरी – १४, करझनी – १०,खंडाळा – ८, कोळवडी – ८, लोणी शहाजनपुर – ११, मांजरसुंबा – १०, केसापुरी (परभणी) – १३, पाटोदा (बेलखंडी) ८, राजुरी – १२, पिंपळनेर – १२, पेडगाव – १२, उंबरज (खालसा) १०, याप्रमाणे घरकुल मंजूर झालेले आहेत.

गावात केवळ एक घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये आहे, त्यामध्ये, आहेर वडगाव, अंबिल वडगाव, बहादरपूर, बोरखेड, पिंपरी, कामखेडा, खडकी घाट, कुटेवाडी, नेकनु पिंपरगव्हाण, या गावांचा समावेश आहे.

तर गावात केवळ दोन घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये अंजनवती, बेलगाव, जिरेवाडी, काटवटवाडी, लिंबागणेश, लिंबारुइ देवी, माळापुरी, मांडवजाळी, मोरगाव, नामलगाव, नाथापूर, पाली, पिंपळगाव (मोची), रुई लिंबा, सोनपेठवाडी, वडगाव (गुंदा) या गावांचा समावेश आहे.

तीन घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये गवळवाडी, नागझरी, नागापूर (बुद्रुक), पिंपळादेवी, रुद्रापूर, सफेपुर या गावांचा समावेश आहे. तसेच चार घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये अवलपुर, सोनगाव, चिंचोली माळी, देवी बाभूळगाव, डोईफोडवाडी, सावरगाव या गावांचा समावेश आहे.

तर अन्य गावांमध्ये भाळवणी – ५, चराटा – ७, घोसापुरी – ६, हिवरा पहाडी साथ – ७, खापर पांगरी – ६, लिंबरुई – ५, मजरा पिंपळगाव – ५, मानकुरवाडी – ६, मंझरी हवेली – ५, मौजवाडी – ५, सोनेगाव – ५, तळेगाव – ६, वडगाव – ५, तांदळवाडी भिल्ल १०, पिंपळवाडी – ५, वरवटी – ७, अशा गावांचा समावेश आहे.

लाभार्थ्यांनी याची दखल घ्यावी, मंजूर असलेल्या घरकुल साठी लाच देण्याच्या उद्देशाने कोणताही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. जनतेने याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

error: Content is protected !!