ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात बॅनर लावले गेले

मुंबई : देशात एकीकडे अच्छे दिन कधी येणार याची अतुरतेने सर्वसमान्य जनता प्रतीक्षा करत आहे. मात्र, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत असल्याने लोक त्रस्त आहेत. यामुळे शिवसेनेच्या युवा विंग म्हणजे युवा सेनेमार्फत मुंबईच्या खार, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात बॅनर लावले गेले आहे.

यामध्ये 2015 आणि यानंतर 2021 पर्यंत गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती किती वाढल्या आहेत, याचा तुलनात्मक उल्लेख करत थेट मोदी सरकारवर निशाना साधला गेला आहे. इतकंच नाही तर हेच अच्छे दिन आहेत का ? असा थेट प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, युवासेने तर्फे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रातली मोदी सरकार हेच जबाबदार आहे असा आरोप करत याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या गंभीर इशारा युवा सेने तर्फे देण्यात आला आहे.

खरंतर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत बरीच ओरड सुरू आहे. बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये दराने विकले जात आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाढत्या किमतीवर भाष्य केलं. ते म्हणाले, तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले आहे. यामुळे तेल आयात करणाऱ्या देशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. भारत कच्च्या तेलाच्या आयातीत जगातील तिसरा मोठा देश आहे.

…म्हणूनच ते कर वसूल करतात: धर्मेंद्र प्रधान

आम्ही तेल उत्पादक देश यांच्याशी सतत संपर्कात आहोत. आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत की, किमती वाढवू नये. येत्या काळात यात बदल होणार आहे. प्रधान म्हणाले, कोरोनामुळे सरकारचे बजेट लक्षणीय वाढले आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही 34 टक्के वाढ केलीय.

सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात. राज्य सरकारही यावेळी खर्च वाढवित आहे, त्यामुळे त्यालाही अधिक कराची गरज आहे. अर्थमंत्री या समस्येवर तोडगा काढतील, अशी आशा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!