ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

धक्कादायक! कुत्र्याने घाण केल्यामुळे रागात महिलेवर थेट कुऱ्हाडीने केला हल्ला.

धक्कादायक! कुत्र्याने घाण केल्यामुळे रागात महिलेवर थेट कुऱ्हाडीने केला हल्ला.

🔸अशोक काळकुटे | संपादक

राग न आवरता आल्यामुळे अनेकांच्या हातून भयंकर गुन्हे घडतात. नागपूर जिल्ह्यातील सावनेर या गावातसुद्धा असाच एक विचीत्र गुन्हा घडला आहे. क्षुल्लक कारणावरुन एकाने महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

कुऱ्हाडीने हल्ला ; महिला गंभीर जखमी.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील सावनेर या गावात आरोपी इंद्रलाल नवरे आणि जखमी झालेली महिला सोनू उईके या दोघाचे एकमेकांच्या शेजारी घरं होती. सोनू उईके यांच्या घरी त्यांनी एक कुत्रा पाळला होता. या कुत्र्याने इंद्रलाल नवरे यांच्या घरी जाऊन घाण केली. याच गोष्टीमुळे इंद्रलाल नवरे आणि सोनू उईके यांच्यात वाद झाला. हा वाद नंतर एवढा टोकाला गेला की, रागाच्या भरात इंद्रलाल नवरे याने सोनू उईके यांच्यावर कुऱ्हाडीने थेट हल्ला केला. हा हल्ला इतका विदारक होता की, यामध्ये सोनू उईके गंभीर जखमी झाल्या.

त्यानंतर, हा प्रकार घडल्यानंतर सावनेर या गावात सर्वत्र खळबळ उडाली. सोनू उईके जखमी झाल्याचे समजताच शेजारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेची स्थिती सध्या गंभीर आहे.

आरोपीला अटक.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सोनू उईके यांच्या कुटुंबीयांनी इंद्रलाल नवरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी इंद्रलाल याला अटक केली आहे. मात्र, कुत्र्याने घाण करण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे थेट कुऱ्हाडीने हल्ला केल्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे.

error: Content is protected !!