ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

बीडकरांच्या मदतीने आम आदमी पार्टी नगरपरिषदेतील घराणेशाहीवर झाडू फिरवणार.

बीडकरांच्या मदतीने आम आदमी पार्टी नगरपरिषदेतील घराणेशाहीवर झाडू फिरवणार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीडमध्ये आम आदमी पक्षाकडून मशागत सुरु-धनंजय माने.

▪️बीड | प्रतिनिधी.
– आम आदमी पक्षाच्या आपला परिवार संवाद यात्रेअंतर्गत बीड येथे दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र सहसंयोजक श्री किशोर मानध्यान(माजी सनदी अधिकारी) व सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. आम आदमी पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यभरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणारी आपला परिवार संवाद यात्रा सुरु केलेली आहे. याअंतर्गत बीड येथे काल दि २२ फेब्रुवारी रोजी बीड येथे कार्यकर्त्यांना संवाद साधला गेला. यावेळी आपचे माजी सनदी अधिकारी असलेले सहसंयोजक श्री किशोर मानध्यान यांनी आपची भूमिका स्पष्ट करत राज्य समिती सर्व कार्यकर्त्यांना बळ देणार असून बीड जिल्ह्यात राजकीय मशागतीचे काम सुरु केले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आम आदमी पक्ष बीड जिल्ह्यात स्थापनेपासून सक्रिय आहे. यापूर्वीही आपने गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न, पीककर्ज, कर्जमाफी आदी विषयात काम केलेले आहे. आता बीड शहरात गेल्या ३ महिन्यांपासून आम आदमी पक्षाने प्रभावीपणे काम केलेले असून ९ आठवड्यांपासून सुरु आलेले स्वच्छता अभियान, शहरातील इमाम्पूर रोड व इतर रस्त्यांसंबंधी केलेले काम शहराच्या पसंतीस उतरलेले आहे. आम आदमी पक्षाने शहराला घातलेल्या श्रमदानाचे ५० मिनिट अथवा साहित्य सहकार्याचे स्वागत बीडकरांनी केलेले असून जनतेचा प्रतिसाद भरभरून मिळत असल्याचे राज्य सचिव धनंजय माने म्हणाले.
बीड शहरात जिल्हाध्यक्ष अशोक येडे हे स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेसाठी पुढे येत आहेत. हे एकमेव पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील ज्यांनी स्वतः हातात झाडू घेतलेला आहे. असे इतर पक्षात होत नाही. आप बदल करण्यासाठी मेहनत घेत आहे, प्रसारमाध्यमांनी आम आदमी पक्षाला मदत केलेली आहे. आप येत्या काळात बीड शहरासह जिल्हाभरात काम करणार असून सामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरत ते सोडवणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बीड शहरात अस्वच्छता आहे, तसेच राजकारणातही एकाच घरात सत्तेचे केंद्रीकरण आहे. या दोन्हीवर आम आदमी पक्ष बीडकरांच्या साथीने झाडू चालवणार असल्याचे धनंजय शिंदे म्हणाले. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष अशोक येडे, संघटनमंत्री ज्ञानेश्वर राऊत, सचिव रामधन जमाले, नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अमरजान पठाण, शहराध्यक्ष सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर, कैलास पालीवाल आदींसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!