ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

“माजलगांव तहसीलदार पाटील यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढल्या नोटिसा;कर्मचाऱ्यांत खळबळ”

“माजलगांव तहसीलदार पाटील यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढल्या नोटिसा;कर्मचाऱ्यांत खळबळ”

टाकरवण। प्रतिनिधी:-
माजलगावच्या तहसीलदार वैशाली
पाटील यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना
चांगली कानउघाडणी करून त्याना नोटीस
बजावली असल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ
उडाली आहे. या विषयी सविस्तर माहिती
अशी की प्रत्येक कार्यालयात कर्मचारी उशिरा येण्याची प्रमाण अधिक आहे या मुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाहीत परंतु या कडे कार्यालय प्रमुख जाणीव पूर्वक दूर्लक्ष करत आहेत परंतु येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी. सोमवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी पाऊणे दहा वाजता स्वतः यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून १०वाजता ज्या-ज्या विभागातील कर्मचारीउशिरा आले, त्या-त्या विभागाला कुलूप ठोकले. या कारवाईमुळे कामचुकारांची
मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
तहसीलदार वैशाली पाटील या
कामचुकारांना धडा शिकविण्यासाठी चक्क९ वाजता तहसील परिसरात आल्या.तहसील कर्मचाऱ्यांनी साधारणतः सकाळी पाऊणे दहा वाजता कार्यालयात हजर राहणे
अपेक्षित असते, मात्र या वेळेत महसूल
विभाग, पुरवठा विभाग, संगणक विभाग,
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी
निराधार योजना विभाग आदी विभागात
अधिकारी, कर्मचारी गैरहजर जाणवले,
यावर तहसीलदार पाटील यांनी तातडीने
प्रत्येक विभागाला कुलुप ठोकले. काही
अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा
नोटीसा बजावल्या. उशिरा येणाऱ्या
अधिकारी, कर्मचाऱ्यांना टाळ्यावर
आणण्यासाठी सतत असे प्रयत्न केले जाणार
आहेत असे तहसीलदार यांनी सांगितले.

error: Content is protected !!