ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

संत महात्म्यांच्या आणि युगपुरुषांच्या योगदानामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला :प्राचार्य डॉ.सानप …. काळे महाविद्यालयात संत गाडगे बाबांची जयंती साजरी

संत महात्म्यांच्या आणि युगपुरुषांच्या योगदानामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला :प्राचार्य डॉ.सानप ….
काळे महाविद्यालयात संत गाडगे बाबांची जयंती साजरी…
बीड दि.२३(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत अनेक संत महात्म्यांनी व योग पुरुषांनी आपले योगदान दिल्यामुळे राज्याची भूमी समृद्ध झाली ,थोर संत महात्म्यांचे व युगपुरुषांचे विचार आणि कार्य सामाजिक आणि राष्ट्रीय उत्कर्ष घडवून आणणारे आहे, त्यांचे विचार व कार्य नव्या पिढीवर रुजविण्याची गरज आहे, असे मत प्राचार्य डॉ.नामदेव सानप यांनी व्यक्त केले.
बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची आज जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे साजरी करण्यात आली .याप्रसंगी डॉसानप बोलत होते .
यावेळी संस्था सचिव प्रा. गणेश पोकळे प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी प्राचार्य डॉ.सानप म्हणाले की ,राष्ट्रसंत गाडगे बाबांनी मानवी स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची मुहूर्तमेढ रोवून संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा संदेश आज संपूर्ण देशासाठी एक मोहीम बनला आहे. थोर संत महात्म्यांच्या आणि युगपुरुषांच्या योगदानामुळे महाराष्ट्र राज्याची भूमी समृद्ध झाली .थोर संत महात्म्यांचे व युगपुरुष यांचे विचार आणि कार्य सामाजिक व राष्ट्रीय उत्कर्ष घडवून आणणारे आहेत त्यांचे विचार व कार्य नव्या पिढीवर रुजविण्याची गरज आहे .असेही डॉ.सानप यांनी म्हटले .
प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी प्रा. वैजनाथ शिंदे प्रा. बप्पासाहेब हावळे प्रा.सुरेश क मी मसबे, सुहास गाढवे, सलीम शेख ,दिपाली बहिर स्वाती नारद ,सचिन चौरे, कुलकर्णी आदी उपस्थित होतेे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय दहिवाळ यांनी केले तर शेवटी वैजनाथ शिंदे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!