ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

तडीपार गुंडाचा पुण्यात हैदोस ; कोयता नाचवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न.

तडीपार गुंडाचा पुण्यात हैदोस ; कोयता नाचवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न.

🔸अशोक काळकुटे | संपादक

तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा प्रकार पुण्यात शिवजयंतीला घडल्याचे उघडकीस आले आहे. गुंड रोशन लोखंडे याने दहशत निर्माण केल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रोशनसोबत नाचणाऱ्या एका गुंडाच्या हातात पिस्तुलही दिसत आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ पाहिल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रोशन लोखंडे याच्याविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे याआधी दाखल आहेत. त्याला याआधीही तडीपार केले होते. आता रोशनला तडीपार करण्याची ही दुसरी वेळ आहे.

गुंडाच्या साथीदाराच्या हातात पिस्तुल.

डान्स करणाऱ्या ग्रुपमधे आणखी एका तरुणाच्या हातात पिस्तुल असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. गुंडांनीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

नागरिकांमध्ये भीती आणि संताप.

या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार असणारे गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे माहित असूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याने नागरिकात संतापाची लाट आहे. पूर्वी तडिपारीच्या नावाने गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होत असे.अशा गुन्हेगारांना समाज देखील आपल्या दैनंदिन व्यवहारापासुन दुर ठेवत असे. पण या गुंडांना कसलीही कायद्याची भिती नसल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात गुंडांचा हैदोस सुरुच.

कुख्यात गुंड शरद मोहोळ अवघ्या १५ दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून त्याची मुक्तता झाली. मात्र २६ जानेवारीला शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी मोहोळला बेड्या ठोकल्या.

तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन काढली मिरवणूक‌.

दुसरीकडे, मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेची तळोजा कारागृहातून मुक्तता झाली. त्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे.

error: Content is protected !!