ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मुद्रण कलेच्या शोधामुळे ज्ञान आणि माहितीचा अखंड झरा प्रवाहित झाला: प्राचार्य डॉ. सानप

मुद्रण कलेच्या शोधामुळे ज्ञान आणि माहितीचा अखंड झरा प्रवाहित झाला: प्राचार्य डॉ. सानप ..
पत्रकारिता महाविद्यालयात मुद्रण दिन साजरा…
बीड दि.२४ (प्रतिनिधी )-जर्मन संशोधक जॉन्सन गुटेनबर्ग यांनी मुद्रण कलेचा शोध लावल्यामुळे संपुर्ण जगात ज्ञान आणि माहितीचा अखंड झरा अनंत काळासाठी प्रवाहित होऊ शकला, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांनी व्यक्त केले.
बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे आज जागतिक मुद्रण दिन साजरा करण्यात आला .या प्रसंगी प्राचार्य डॉ.नामदेव सानप हे बोलत होते .
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. सानप म्हणाले की ,इ.स.चौदाशे पन्नास मध्ये जर्मन संशोधक जॉन्सन गटेनबर्ग यांनी मुद्रण कलेचा शोध लावला. मुद्रण कलेचा शोधामुळे जगात ज्ञान आणि माहितीचा अखंड झरा सुरू झाला. मुद्रणकलेच्या विकासामुळे मानवी विकासला गती प्राप्त झाली. त्याबरोबरच संपूर्ण जगाच्या भौगोलिक विकासाला चालना मिळू शकली. मुद्रण कलेतील नव्या शोधामुळे तर प्रचार प्रसार माध्यम शक्तिशाली बनली. मुद्रण कलेचा शोध लावून गटेनबर्ग यांनी संपूर्ण जगाला अमूल्य देणगी दिली. आजच्या आधुनिक मुद्रण कलेचा पाया गुटेनबर्ग यांनी रचला असेही प्राचार्य डॉ.सानप यांनी म्हटले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय दहिवाळ यांनी केले यावेळी प्रा.बप्पासाहेब हावळे, प्रा. वैजनाथ शिंदे प्रा.सुरेश कसबे, दिपाली बहिर ,सौ स्वाती नारद ,सचिन चौरे आदी उपस्थित होते शेवटी प्रा. वैजनाथ शिंदे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!