ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या लेखक, कवी प्रवीण दवणे यांची मुलाखत

मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘माय मराठी, साद मराठी’ या विषयावर साहित्यिक प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरुवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मराठी भाषा संवर्धन, श्रवण,वाचन यांचा भाषावर्धनातील वाटा, बदलत्या काळात बदलत्या समाजमाध्यमांमुळे येणाऱ्या काळातला मराठीचा प्रवास आणि बदलणारे स्वरूप,जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याकरिता मराठी भाषेतील शिक्षणाचे महत्त्व,गीतरचना करताना बोली भाषेची रंगत, मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत आदी विषयांची माहिती श्री. दवणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे

error: Content is protected !!